इंटरनेटच्या आजच्या जगात कोणत्याही प्रश्नाचे उत्तर माहीत नसल्यास ‘गुगल कर’ असे सर्रास म्हटले जाते. जवळपास सर्वच प्रश्नांची उत्तरे ‘गुगल बाबा’कडून मिळतात; पण गुगलला वारंवार किंवा सर्वाधिक वेळेस कोणते प्रश्न विचारले जातात हे माहितीये का? गुगलवर ४ अब्जाहून अधिक वेळेस सर्च केलेल्या कीवर्डनुसार दर महिन्याच्या सर्च डेटावर आधारित अशाच १०० प्रश्नांची यादी समोर आली आहे.
गुगलला विचारले जाणारे टॉप १० प्रश्न...
प्रश्न महिन्याला किती सर्चमाझा आयपी काय आहे? ११, ६०,०००एका वर्षात किती आठवडे? ६,७२,०००एका कपात किती अंश द्रव राहतो? ६,१७,०००मॅकवर स्क्रीनशॉट कसा घ्यावा? ५,४२,०००सुपर बॉल (स्पर्धा) कधी आहे? ४,६८,०००इस्टर कधी आहे? ४,६६,०००फादर्स डे कधी असतो? ३,६८,०००जुनिटीथ म्हणजे काय? ३,४८,०००मी मतदानासाठी नोंदणी कशी करू? ३,४५,०००थँक्सगिव्हिंग डे कधी आहे? ३,३१,०००
वेगळे प्रश्न कोणते?
nएका कपात किती अंश द्रव राहतो? हा यादीतील तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न सर्वांत वेगळा आहे. गुगलला हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. nयाशिवाय, जुनिटीथ म्हणजे अमेरिकेतील सार्वजनिक सुट्टीबाबत आणि सुपर बॉल या फुटबॉल स्पर्धेबाबतचाही प्रश्न सतत विचारला जातो. nआभारासाठीचा दिवस अर्थात थँक्सगिव्हिंग डे कधी असतो? हा प्रश्नही विचारला आहे.