जगाच्या प्रत्येक भागात ब्लू जीन्स वापरली जाते. तुम्हीही कधीना कधी ब्लू जीन्स घातली असेलच. खासकरून तरूणाई जीन्स आवडीने घालतात. भारतातही ब्लू जीन्स मोठ्या प्रमाणात वापरली जाते. पण तुम्हाला याच्या शोधाचं भारतीय कनेक्शन माहीत आहे का? नसेल माहीत तर चला जाणून घेऊ.
ब्लू जीन्सचा शोध १८७१ मध्ये Levi Strauss आणि Jacob Davis यांनी मिळून अमेरिकेत लावला होता. अमेरिका, भारतापासून हजारो मैल दूर आहे. तरीही यात भारताही महत्वाची भूमिका आहे. ती भूमिका याच्या नावातच दडली आहे. Levi Strauss आणि Jacob Davis ने निळ्या जीन्ससाठी जो रंग सेट केला होता तो त्यांनी भारतीय नीळवरून प्रेरित होऊन सिलेक्ट होता. (हे पण वाचा : बाबो! 'या' खेकड्याचं निळं रक्त जगात आहे सर्वात महाग, एक लिटर रक्ताची किंमत ११ लाख रूपये!)
ब्लू जीन्सचा शोध
Levi Strauss ने कॅलिफोर्नियाच्या खाणीत आणि कारखान्यांमध्ये काम करणाऱ्यांच्या एका गोष्टीकडे लक्ष दिलं. ती ही की, त्यांचे कपडे लवकर फाटत होते. अशात त्यांना अशा कपड्यांची गरज होती जे मजबूत असावे. तेव्हा Levi Strauss ने जॅकब डेविस नावाच्या टेलरसोबत मिळून सूती ब्लू जीन्स तयार केली. भारतीय नीळ वापरून रंगवलेला कपडा त्यांनी इटलीच्या जेनोओमधून मागवला. यावरून याचं नाव जीन्स पडलं. आता नीळ भारतातून इटली आणि तेथून अमेरिकेत कशी पोहोचली? हे जाणून घेण्यासाठी आधी नीळीचा इतिहास जाणून घ्यावा लागेल. (हे पण वाचा : टॅबलेटच्या पॅकेटवर लाल रंगाची रेष का असते? माहीत नसेल तर होईल मोठं नुकसान)
नीळं सोनं
प्राचीन काळात लोक मोजक्याच रंगाचे कपडे घालत होते. पण जसा इंडिया डाय(नीळ) चा अविष्कार झाला. निळ्या रंगाचे कपडे एक लक्झरी आयटम बनला. निळीची शेती आधी अमेरिकेत खूप होत होती. याची डिमांड वैश्विक बाजारात जास्त होती. मध्य युगादरम्यान यूरोपमध्ये इंडिगो फार दुर्लभ आणि महागडा होता. याला निळं सोनंही म्हटलं जात होतं. १८व्या शतकात जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर राज्य सुरू केलं तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना निळीची शेती करण्यासाठी भाग पाडलं. याची फार मागणी होती आणि यातून व्यापाऱ्याला फायदा होणं नक्की होतं.
डेनिम जीन्स
१८१० पर्यंत ब्रिटन द्वारे आयात केलेल्या निळीत भारतीय निळीचा भाग ९५ टक्के झाला होता. म्हणजे जगभरात जी नीळ वापरली जात होती ती भारतातून तयार होऊन जात होती. अशाप्रकारे नीळ इटलीला पोहोचली आणि तेथून अमेरिकेला पोहोचली. आता जी ब्लू जीन्स Levi Strauss ने बनवली होती. ती नंतर इटलीच्या काही लोकांनी कॉपी केली. त्याला त्यांनी De Nimes नाव दिलं. जे पुढे जाऊन डेनिम नावाने पॉप्युलर झाली.