सध्या आपण सर्वच प्रकारच्या छोट्या-मोठ्या प्रश्नाची उत्तरे मिळविण्यासाठी गुगलची मदत घेतो. खरे तर सर्च हिस्ट्री (Google Search History) डिलीट करण्याचा पर्याय आपल्याकडे आहे. मात्र, तरीही आपले सर्च गुगलवर कुठे ना कुठे नक्कीच सेव्ह असते. विवाहित महिला गुगलवर सर्वात जास्त काय सर्च करतात? हे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. तर जाणून घेऊयात, विवाहित महिला गुगलवर नेमकं काय सर्च करतात...
विवाहित महिला Google वर पतीसंदर्भात या गोष्टी करतात Search -गुगलच्या (Google) आकडेवारीनुसार, विवाहित महिला आपल्या पतीला काय आवडते, त्यांची चॉईस काय आणि त्यांची पसंत-नापसंत काय, यासंदर्भात कशा पद्धतीने माहिती मिळवावी, यासंदर्भात सर्वाधिक सर्च करतात. याशिवाय विवाहित महिलांनी आपल्या पतीचे मन कसे जिंकावे, त्यांना आनंदी कसे ठेवावे? असा प्रश्नही अनेक वेळा गुगलवर विचारण्यात आला आहे.
एवढेच नाही, तर आपल्या पतीला मुठीत कसे ठेवायचे, त्यांना 'जोरू का गुलाम' कसे बनवायचे? असा प्रश्नही काही विवाहित महिलांनी गुगलवर विचारला आहे, असा धक्कादायक खुलासाही समोर आला आहे. याच बरोबर फॅमिली प्लॅनिंगसंदर्भात आणि मुलाला जन्म देण्यासंदर्भात योग्य वेळ कोणती? हेदेखील महिलांना जाणून घ्यायचे आहे.
असे प्रश्नही विचारतात विवाहित महिला - वरील प्रश्नांव्यतिरिक्त, काही प्रश्न असेही आहेत, ज्यांसंदर्भात महिला लग्नानंतर गुगलवर सर्च करतात. लग्नानंतर आपण नव्या कुटुंबात अथवा घरात कशा पद्धतीने राहायला हवे? लग्नानंतर, आपल्या नव्या कुटुंबाची जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडायला हवी? असे प्रश्नही महिला गुगलवर विचारतात.