ऑनलाईन जेवण किंवा कपडे मागवल्यानंतर भलतंच हाती येणं किंवा काहीतरी गोंधळ होणं हे काही आपल्यासाठी नवीन नाही. नेहमीच अशा प्रकारच्या घटना घडतात अनेकदा फसवणूकीचा सामना करावा लागतो. फिलीपींसमधून असाच एक प्रकार समोर आला आहे. एका मुलीने ऑनलाईन जेवण मागवलं आणि तिची ऑर्डर घेऊन ४२ वेगवेगळे डिलिव्हरी बॉईज पोहोचले. आपण जेवण मागवल्यानंतर असं काहीतरी होईल अशी कल्पनाही या मुलीला नव्हती. या प्रकरणाबद्दल कालांतराने खुलासा झाला आहे. ही घटना वाचून सोशल मीडिया युजर्सना हसू अनावर झाले आहे.
सन स्टार डॉट कॉम च्या एका रिपोर्टनुसार फिलीपींसच्या सेबू सिटीमधील एका शाळकरी मुलीने फूड अॅप्लिकेशनमधून जेवण मागवलं. जेवण मागवल्यानंतर आपल्या आजीसोबत ऑर्डर येण्याची वाट पाहत होती. त्यानंतर जे झालं ते खूपच आश्चर्यजनक होतं. काहीवेळानंतर या मुलीच्या घरासमोर जेवण घेऊन आलेल्या मुलांची रांगच लागली. या मुलीचे घर ज्या गल्लीत होतं. त्या ठिकाणी जवळपास ४२ डिलिव्हरी बॉय एकत्र झाले होते. लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावालांचे भव्य घर पाहिलेत का? पाहा झक्कास फोटो
या सगळ्या मुलांना पाहून आजूबाजूच्या लोकांनी काय झालंय ते पाहण्यासाठी गर्दी केली. एका स्थानिक मुलाने या डिलिव्हरी बॉईजचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केले. काहीवेळानंतर या प्रकरणाबाबत खुलासा झाला. हा सगळा गोंधळ फूड डिलिव्हरी एपच्या तांत्रिक बिघाडामुळे झाला. ज्यामुळे एका ऑर्डरऐवजी ४२ ऑर्डर्स घेऊन डिलिव्हरी बॉईज पोहोचले. परदेशातली नोकरी सोडली; घराच्या गच्चीवर कमळं उगवायला सुरूवात केली, आता घेतोय लाखोंच्या ऑर्डर