आपल्या जीवनात रोज अशा काही घटना समोर येत असतात ज्या वाचून एकतर धक्का बसतो किंवा अवाक् व्हायला होतं. जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची आपल्याला माहिती नसते. ती माहिती वेळोवेळी समोर येत असते. असे बरेच शब्द असतात जे आपण नेहमीच वापरतो पण ते कुठून आले त्याची माहिती आपल्याला नसते. जे शब्द आपल्याला हिंदी किंवा इंग्रजीमधून माहीत असतात, नंतर समजतं की, ते दुसऱ्याच भाषेतून आले आहेत.
ऑनलाईन प्लॅटफॉर्म 'कोरा'वर एका यूजरने विचारलं की, जिराफला हिंदीमध्ये काय म्हणतात? हा शब्द कुठून आला आणि हा कोणत्या भाषेतून आला आहे? वेगवेगळ्या यूजरने यावर आपली मते मांडली. ती काय ते जाणून घेऊ.
हिंदीत जिराफला काय म्हणतात?
आजपर्यंत तुम्ही हिंदी, मराठी आणि इंग्रजीमध्ये जिराफला जिराफच म्हटलं असेल. यावर अनेकांना आपली मते नोंदवली आहेत. पण यातून हे समोर आलं की, जिराफसाठी हिंदीत वेगळा काही शब्द नाहीच.
विकीपीडियानुसार, जिराफ शब्द मूळ रूपाने अरबी भाषेतून आला आहे. कदाचित तो आफ्रिकी भाषेतून अरबीत आला असेल, पण 1590 मध्ये अरबी भाषेतून हा शब्द इटालियन भाषेत आला आणि नंतर इंग्रजीमध्ये. तेच एका यूजरने सांगितलं की, हा फारसी भाषेतील शब्द जूर्नापातून आला आहे. जो नंतर सीरियाक भाषेत जारीपा झाला आणि शेवटी अपभ्रंश होऊन जिराफ बनला. हिंदीत अरबी-फारसीचे अनेक शब्द जसेच्या जसे स्वीकारले आहेत. तसा जिराफही तसाच्या तसाच घेतला आहे.
संस्कृतमध्ये जिराफला काय म्हणतात?
आता असाही प्रश्न आहे की, संस्कृतमध्ये जिराफला काय म्हणतात? संस्कृतमध्ये जिराफला वेगळा शब्द आहे. जिराफला संस्कृतमध्ये चित्रोष्ट्र असं म्हणतात. ज्याचा अर्थ होतो चट्टे असलेला उंट. संस्कृतमध्ये उष्ट्र शब्द उंच प्राण्यासाठीही वापरला जातो. अशात चित्रोष्ट्र जिराफसाठी वापरला जातो. तेच आणखी एक प्राचीन भाषा पालीमध्ये जिराफला दीघगीवमिग म्हणजे लांब मान असलेला हरिण म्हटलं जातं.