शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
3
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
4
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
5
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
6
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
7
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
8
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
9
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
10
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
11
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
12
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

विमानात एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाल्यास काय करतात? जाणून घ्या ही एअर होस्टेस काय सांगते...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 6:46 PM

आजवर विमानात मृत्यू झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत. अशा प्रसंगी काय करता येतं त्याची कल्पना सर्वसामान्यांना नसते. त्याची माहिती देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय.

प्रवास करताना येणाऱ्या संकटांपैकी एक म्हणजे प्रवासादरम्यान येणारी मेडिकल इमर्जन्सी. प्रवासातच काही जणांचा मृत्यू होण्याचेही प्रसंग घडतात. रेल्वे किंवा इतर वाहनांतून प्रवास करताना कोणाचा मृत्यू झाल्यास संबंधित वाहनं थांबवता येतात; मात्र विमानप्रवासात कोणाचा मृत्यू झाल्यास तसं करता येत नाही. आजवर विमानात मृत्यू झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत. अशा प्रसंगी काय करता येतं त्याची कल्पना सर्वसामान्यांना नसते. त्याची माहिती देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. एका एअर होस्टेसनं हा व्हिडिओ तयार केलाय. आतापर्यंत व्हिडिओला 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

शीना मारी नावाच्या एका 25 वर्षांच्या फ्लाइट अटेंडंटनं  नुकताच एक व्हिडिओ तयार केलाय. विमानप्रवासात एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाल्यास काय नियम असतात हे तिनं यात समजावून सांगितलं आहे. एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाल्याचा संशय आल्यास फ्लाइट अटेंडंट तिथे जाऊन त्या व्यक्तीची नाडी तपासतात. त्यावरून मृत्यू झाल्याचं निदान झालं, तर विमानाच्या मागच्या बाजूला जागा असल्यास तिथे मृतदेह ठेवला जातो. विमानातल्या सर्व सीट्स भरलेल्या असतील, तर मृतदेह सीटवरच ठेवला जातो. अशा वेळी मृतदेह कापडात गुंडाळून ठेवला जातो व सुरक्षेसाठी सीटबेल्टही बांधले जातात.

प्रवाशाच्या मृत्यूबाबत संभ्रम असल्यास किंवा त्याच्या जगण्याची काही शक्यता असल्यास विमानात कोणी वैद्यकीय अधिकारी आहे का हे तपासलं जातं. विमानात डॉक्टर असेल, तर त्यांना तिथे बोलावून त्यांच्याकडून तपासणी करून घेतली जाते, असं शीना यांनी व्हिडिओत सांगितलं आहे. गरज पडल्यास शस्त्रक्रियादेखील करता येऊ शकते, इतकं साहित्य विमानात उपलब्ध असतं. त्यानंतर वैमानिकाला या परिस्थितीबद्दल सांगितलं जातं. मग वैमानिक त्या एअरलाइन्ससाठी उपलब्ध असलेल्या ऑन कॉल डॉक्टर्सशी संपर्क साधतात व फ्लाइटमध्ये कोणी डॉक्टर नसल्यास क्रू मेंबर्सना परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं. फ्लाइट अटेंडंट डॉक्टर्स नसतात. त्यामुळे त्यांना कोणाला मृत घोषित करण्याचा अधिकार नसतो, असं शीनानं या व्हिडिओत म्हटलंय.

प्रवाशाचा मृत्यू झाल्याच्या कारणामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्याची आवश्यकता नसते. तसंच विमानाचा मार्ग बदलण्याचीही आवश्यकता नसते. याबाबत वैमानिकाला अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार असतो. एअर ट्रॅफिक कंट्रोलर आणि डॉक्टरांशी चर्चा करून वैमानिक निर्णय घेऊ शकतो. अर्थात असे मृत्यू दुर्मीळ असतात. व्यावसायिक फ्लाइट्समध्ये मृत्यू होण्याची घटना फारशी घडत नाही. 600 विमान उड्डाणांमध्ये एखादी मेडिकल इमर्जन्सी होते किंवा 10 लाख प्रवाशांमध्ये 16 मेडिकल इमर्जन्सी घडतात, असं ग्लोबल रेस्क्यूचे असोसिएट मेडिकल डायरेक्टर डॉ. क्लॉडिया झेगन्स यांनी Conde Nast Traveler शी बोलताना सांगितलं.

प्रवासादरम्यान मृत्यू झाल्यास प्रत्येक एअरलाइनचे याबाबतचे नियम वेगवेगळे आहेत; मात्र आपण तीन एअरलाइन्समध्ये काम केलं आहे. त्या तिन्हीमध्ये सर्वसाधारण एकसारखेच नियम होते, असंही शीनानं सांगितलंय. सगळे प्रवासी उतरल्यावरच डॉक्टर्सना बोलावून मृतदेहाची तपासणी केली जाते, असंही तिनं या व्हिडिओत म्हटलं आहे.

IATA चे नियम काय आहेत?'इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन'चे (IATA) याबाबत काही नियम आहेत. त्यानुसार, प्रवासी जगण्याची काही शक्यता असल्यास क्रू मेंबर्सपैकी कोणी प्रवाशाला CPR देऊ शकतो. जोपर्यंत प्रवासी श्वास घ्यायला लागत नाही किंवा वैद्यकीय मदत मिळत नाही, तोपर्यंत तो देता येतो. या नियमांनुसार, एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाल्यास वैमानिकाला कळवावं लागतं. त्याचं कारण वैमानिकाला लँडिंग स्टेशनला पुढची तयारी करण्यासाठी सूचना द्यावी लागते. मृतदेह कमीत कमी प्रवासी असतील अशा ठिकाणी हलविणं गरजेचं असतं किंवा जागा उपलब्ध नसल्यास तो सीटवरच ठेवला जावा असे हे नियम सांगतात. मृतदेह बॅगमध्ये ठेवला जावा किंवा मानेपर्यंत कापडात गुंडाळला जावा. डोळे बंद करून सीट बेल्टने बांधला जावा, असंही नियमांमध्ये सांगितलंय.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके