मृत्यू हा अटळ आहे. एक ना एक दिवस सगळ्यांनाच मृत्यू येणार आहे. मृत्यूचा सामना करताना सगळ्यात आधी तुमच्या समोर काय येईल? तुम्ही कुणाची आठवण काढाल? याचं उत्तर कुणाकडेच नसतं. पण अमेरिकेतील डॉक्टरांनी याबाबत काही खुलासे केले आहेत. त्यांनी सांगितलं की, मृत्यूआधी जास्तीत जास्त लोक कोणत्या शब्दांचा वापर करतात.
डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, सॅन फ्रांसिस्कोमधील डॉक्टर मीना चांग यांनी सांगितलं की, जास्तीत जास्त रूग्ण म्हणतात की, 'मला काहीच पश्चाताप नाही'. धर्मशाळेतील नर्स जूली मॅकफॅडेन म्हणाल्या की, वृद्ध लोक आपल्या परिवारापासून दूर राहिल्याचा किंवा फार जास्त काम करत राहिल्याचा खेद व्यक्त करतात. आपल्या आई किंवा वडिलांना बोलवतात. भलेही ते आधीच वारलेले असतील तरीही. अनेक लोक एक्स बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडची आठवण काढतात. दोन्ही डॉक्टर जे लोक फार आजारी आहेत किंवा त्यांची वेळ जवळ आली आहे अशा लोकांची काळजी घेतात. त्यांनी बऱ्याच लोकांना आपल्या डोळ्यांसमोर अखेरचा श्वास घेताना पाहिलं आहे.
काय बोलतात लोक?
डॉ. चांग यांच्यानुसार, बरेच लोक आपल्या जवळच्या लोकांची आठवण काढतात त्यांना I LOVE YOU म्हणतात. माफी मागतात आणि इतरांना माफीही देतात. काही लोक 'चला येतो' अशा शब्दाचा वापर करतात. डॉक्टर चांग म्हणाल्या की, रूग्णांसोबत त्यांच्या जीवनाच्या शेवटापर्यंत राहणं, त्यांची साथ देणं फार खास क्षण असतात. आम्ही भाग्यवान आहोत की, अशा क्षणांचा आम्ही भाग होऊ शकलो.
लॉस एंजलिस कॅलिफ़ोर्नियाच्या नर्स जूली मॅकफॅडेन या 7 वर्षापासून अधिक काळ धर्मशाळेत सेवा करतात आणि 15 पेक्षा अधिक वर्षापासून त्या नर्स आहेत. जूली यांनी टिकटॉकवर अनुभव शेअर केलेत. जूली यांनी सांगितलं की, मृत्यूचा ठीक आधी त्यांनी त्यांच्या जास्तीत जास्त रूग्णांच्या श्वास घेण्याच्या पद्धतीत बदल पाहिला. त्याशिवाय त्वचेचा रंग बदलणे, ताप येणे, पुन्हा पुन्हा जवळच्या लोकांची नावे घेणे इत्यादी गोष्टी होतात. त्या म्हणाल्या की, मृत्यूआधी जास्तीत जास्त लोकांनी सावल्या दिसू लागतात. या सावल्यांमध्ये ते त्यांच्या आधीच वारलेल्या जवळच्या लोकांना बघतात.