आजच्या काळात गुगल वापर नाही असा क्वचितच कुणी सापडेल. कोणतीही माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला गुगल करावं लागतं. गुगलवर अनेक वेबसाइट्स आहेत. यातील काही तुम्हाला बघायच्या असतील तर तुम्हाला तुम्ही मनुष्य असल्याचा पुरावा द्यावा लागतो. स्क्रीनवर एक बॉक्स येतो ज्यात तुम्हाला विचारलं जातं की, तुम्ही कन्फर्म करा की, तुम्ही रोबोट नाहीत. यासाठी तुम्हाला बॉक्सवर टिक करावं लागतं.
सामान्यपणे सगळे लोक या बॉक्सवर टिक करतात. जास्तीत जास्त लोकांना हेच वाटतं की, गुगल माउसच्या मुव्हमेंटने मनुष्य आणि रोबोट यांच्यातील फरक डिटेक्ट करतात. पण सत्य काही वेगळंच आहे. जसे तुम्ही बॉक्सवर टिक करता. तसे ते तुमच्या वेबसाइट ब्राउजिंगची हिस्ट्री मिळवतात. हे करून त्यांना तुमच्या आधीच्या सगळ्या सर्चची माहिती मिळते.
सोशल मीडिया बीबीसीच्या क्विज शोचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत बॉक्सवर टिक करण्याचं कारण सांगण्यात आलं आहे. यात सांगण्यात आलं आहे की, जसेही तुम्ही बॉक्सवर टिक करता, तुमची ब्राउज़िंग हिस्ट्री त्यांना दिसते. तुम्ही आधी काय सर्च केलं हेही त्यांना कळतं. त्या आधारावर कॉम्प्युटर हे डिटेक्ट करतं की, तुम्ही मनुष्य आहात की रोबोट? म्हणजे तुम्ही जसेही बॉक्सवर टिक करता तुम्ही वेबसाइटला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन देण्याची परवानगी देता.