What Is Snake Wine: दारू पिणारे लोक कधी व्हिस्की पितात तर कधी रम तर कधी व्होडका किंवा बिअर पितात. जगभरात वेगवेगळ्या प्रकारच्या दारू मिळतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका दारूबाबत सांगणार आहोत ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. एक देश असा आहे जिथे विषारी सापांपासून तयार दारू दिली जाते. ही काही गंमत नाही तर सत्य आहे. जगात असेही देश आहेत जिथे दारू बनवण्यासाठी विषारी सापांचा वापर केला जातो.
विषारी सापांपासून तयार दारूला 'स्नेक वाइन' म्हटलं जातं. ही दारू साऊथ ईस्ट देश जसे की, चीन आणि व्हिएतनाममध्ये बरीच पसंत केली जाते. इथे फिरायला येणाऱ्या लोकांमध्ये या दारूला फार डिमांड असते.
व्हिएतनामी भाषेत याला खमेर म्हटलं जातं. ही दारू तांदळाच्या किंवा धान्याच्या दारूत पूर्ण साप टाकून बनवली जाते. हे पेय पहिल्यांदा झोउ वंशादरम्यान बनवण्यात आलं होतं. नंतर ही दारू चीन, कंबोडिया, जपान, कोरिया, लाओस, तायवानसारख्या देशांमध्ये लोकप्रिय झाली.
कशी बनवली जाते स्नेक वाइन?
यात सापांना एका बॉटलमध्ये ठेवून आणि त्यात तांदळाची किंवा गव्हाची दारू टाकली जाते. त्यात फॉर्मलाडेहाइडही टाकलं जातं. सोबतच यात औषधी जडीबुटीही टाकल्या जातात. हे मिश्रण बरेच दिवस साठवून ठेवलं जातं आणि नंतर लोकांना दिली जाते.
असं सांगितलं जातं की, अशाप्रकारची दारू प्यायल्याने मानवी शरीरावर काही खास प्रभाव पडत नाही. कारण यात विषारी सापांसोबत अल्कोहोलही बरेच दिवस ठेवलं जातं. तांदळाच्या दारूतील इथेनॉल सापाचं विष नष्ट करतं.
तसेच याचे फायदेही सांगितले जातात. हे पेय औषध म्हणूनही बाजारात विकलं जातं. अनेक समस्या दूर करण्यासाठी लोक याचं सेवन करतात. याला लोक एक टॉनिक समजतात.