भारतात अनेक राज्य आहेत. प्रत्येक राज्याची आपली राजधानी आहे. शाळेतील मुलांना प्रत्येक राज्याची राजधानी काय हे शिकवलं जातं. तसेच भारत देशाची राजधानी काय आहे हेही सांगितलं जातं. देशाची राजधानी असलेल्या ठिकाणाला फार महत्व असतं. जवळपास सगळ्यांनाच आपापल्या देशाच्या राजधानीचं नाव माहीत असतं.
भारतातील जास्तीत जास्त लोकांना जर विचारलं की, भारताची राजधानी कोणती आहे तर सगळ्यांचं उत्तर दिल्ली असं असेल. सामान्यपणे सगळे लोक दिल्ली हीच भारताची राजधानी मानतात. पण तुम्हाला माहीत नसेल की, हे चुकीचं उत्तर आहे. भारताची राजधानी दिल्ली नाही.
जर तुम्हाला यापुढे कुणी भारताच्या राजधानीचं नाव विचारलं तर चुकीच्या उत्तराऐवजी बरोबर उत्तर द्याल. भारताची राजधानी दिल्ली नाही तर नवी दिल्ली आहे. कारण दिल्लीमध्ये एकूण 11 जिल्हे आहेत. यात नॉर्थ दिल्ली, नॉर्थ ईस्ट दिल्ली, नॉर्थ वेस्ट दिल्ली, वेस्ट दिल्ली, साउथ दिल्ली, साउथ वेस्ट दिल्ली, साउथ ईस्ट दिल्ली, नई दिल्ली, सेंट्रल दिल्ली, शाहदरा आणि ईस्ट दिल्ली यांचा समावेश आहे. या अकरा जिल्ह्यांना मिळून दिल्ली बनली आहे आणि यातील एक जिल्हा नवी दिल्ली भारताची राजधानी आहे.
जर तुम्हाला दिल्ली एनसीआरबाबत सांगायचं तर यात 35 जिल्हे येतात. हे जिल्हे उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान यांच्यात वाटले आहेत. म्हणजे दिल्ली, नवी दिल्ली आणि दिल्ली एनसीआर हे तिन्ही भाग वेगवेगळे आहेत. पण लोक माहिती नसल्याने या सगळ्या भागांना एकच मानतात. जेव्हा लोकांना यांबाबत काही विचारलं जातं तेव्हा चुकीचे उत्तर देतात. अशात आता जर तुम्हाला देशाची राजधानी कोणती? तेव्हा बरोबर उत्तर द्याल.