Red and Blue Coach In Railway : उत्सवांचा सीझन सुरू झाला असून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. रेल्वे स्टेशनवर गर्दीच गर्दी बघायला मिळत आहे. अनेकांचे तिकीटही वेटींगवर आहेत. गाड्यांची संख्या वाढल्याने लेटही होत आहेत. कितीतरी लोक रोज रेल्वेने प्रवास करतात. पण अजूनही त्यांना रेल्वेबाबत अनेक गोष्टी माहीत नसतात. तुम्हीही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल, पण तुम्ही कधी रेल्वेच्या लाल आणि निळ्या डब्यांचं अर्थ काय? किंवा रेल्वेचे डबे लाल आणि निळ्या रंगाचे का असतात? याचा विचार केलाय का? नक्कीच केला नसेल. पण आज आम्ही तुम्हाला याचा अर्थ सांगणार आहोत.
दोन रंगांमधील फरक
भारतीय रेल्वेत ICF आणि LHB कोच असतात. निळ्या रंगाचे डबे ICF असतात आणि लाल रंगाचे LHB असतात. यात बराच फरक असतो. भारतात एक्सप्रेस रेल्वेंमध्ये निळ्या रंगाची बोगी दिसेल तर राजधानी आणि सुपरफास्ट प्रीमियम रेल्वेत लाल कोच दिसतील. लाल डबे निळ्यांच्या तुलनेत जास्त सेफ असतात. लाल डब्यांना अॅँटी-टेलीस्कोपिक डिझाइनने तयार केलं जातं. अशात ते एकमेकात भिडत नाहीत आणि सहजपणे रूळावरून घसरत नाहीत. इतकंच नाही तर टक्कर झाल्यावर बोगी एकमेकांवर चढत नाही. हे कोच 200 किलोमीटर प्रति तासांच्या स्पीडने धावणाऱ्या रेल्वेत असतात.
निळ्या डब्यांचं काय?
मीडिया रिपोर्टनुसार, निळ्या डब्यांचं निर्माण चेन्नईमध्ये केलं जातं. हे लोखंडापासून तयार केले जातात. तसेच यात एअर ब्रेकचा वापर केला जातो. या डब्यांचं मेंटेनन्स करण्यासाठी जास्त खर्च येतो. तसेच यात सीटही कमी असतात. या डब्यांचं लाइफ पंचवीस वर्षे असतं. त्यानंतर हे डबे सेवेतून काढले जातात. तर लाल डब्यांचा वापर 30 वर्ष केला जातो.