(Image Credit : Twitter)
असं म्हणतात की, जोड्या स्वर्गातच बांधलेल्या असतात. पण बिहारमधील लोक पृथ्वीवरच जोड्या बनवतात. त्याही जबरदस्तीने. समस्तीपूरच्या मोरवामध्ये एका तरूणाची जोडी बनवण्यात आली. हा तरूण आपल्या बहिणीला तिच्या सासरी सोडायला गेला होता. पण त्याला अजिबात कल्पना नव्हती की, त्याच्या बहिणीचं सासर हे त्याचंही सासर बनेल.
जबरदस्ती करण्यात आलं लग्न
आपल्या बहिणीला सासरी सोडायला गेलेल्या तरूणाचं लग्न जबरदस्ती त्याच्या बहिणीच्या नंदेसोबत लावून देण्यात आलं. बहिणीच्या सासरचे लोक मुलीच्या लग्नावरून अनेक वर्षापासून चिंतेत होते. सगळेजण मोठा हुंडा मागत होते. अशात त्यांना त्यांच्या सूनेच्या भावाच्या रूपात मुलीचा नवरदेव दिसला. मग त्याला पकडून मंदिरात त्याचं लग्न लावून देण्यात आलं.ही घटना दलसिंह सरायच्या साठा येथील रहिवाशी विनोद कुमारसोबत घडली. जेव्हा तो त्याच्या बहिणीला सासरी सोडण्यासाठी गेला तेव्हा तिच्या सासरच्या लोकांनी त्याला पकडून एका मंदिरात त्याचं जबरदस्ती लग्न लावून देण्यात आलं.
तरूणाच्या मर्जीशिवाय त्याला नवरदेव बनवून तरूणीसमोर उभं केलं. नंतर जबरदस्ती एकमेकांना हार घालण्यात आले. मग त्याच्याकडून तरूणीची भांग कुंकवाने भरण्यात आली. लग्नानंतर विनोद कुमार म्हणाला की, त्याचं लग्न त्याच्या मर्जीशिवाय जबरदस्ती लावून देण्यात आलं.
लग्नाचा व्हिडीओ व्हायरल
या जबरदस्ती लावण्यात आलेल्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत जबरदस्ती तरूणाचा हात पकडून हार घालण्यात आले. व्हिडीओ बघितलं जाऊ शकतं की, यादरम्यान तरूणी गपचूप त्याच्या बाजूला उभी होती. एकीकडे तरूण सांगतोय की, त्याचं जबरदस्ती लग्न लावून देण्यात आलं. तर मुलीच्या लोकांकडून सांगण्यात आलं की, तरूण जेव्हाही त्याच्या बहिणीला सोडण्यासाठी सासरी येत होता तेव्हा तो लपून लपून मुलीला भेटत होता. दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं. त्यामुळे परिवाराने दोघांचं लग्न लावून दिलं.
काय असतं पकडौआ लग्न?
अशाप्रकारच्या लग्नाला पकडौआ विवाह म्हटलं जातं. एक काळ असा होता जेव्हा बिहारमध्ये जबरदस्ती अशी लग्ने नेहमीच होत होती. पकडौआ विवाहात एखाद्या तरूणाचं आधी अपहरण केलं जात होतं आणि मग घाबरवून जबरदस्ती त्याचं लग्न लावून दिलं जात होतं. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, ८०च्या दशकात बिहारच्या अनेक भागात अशा लग्नांचं फार चलन होतं. अशा लग्नांची झलक काही सिनेमांमध्येही बघायला मिळते.
रिपोर्ट्सनुसार, एक काळ असा होता जेव्हा गावांमध्ये अशी लग्ने लावली जात होती. त्यासाठी अनेक लोकांच्या गॅंग असायच्या. या गॅंग इंटरची परीक्षा देणारे विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्या तरूणांचं लग्नाच्या सीझनमध्ये अपहरण करत होत्या. अशात तरूणांना लग्नाच्या सीझनमध्ये कुठे बाहेर जाण्यास मनाई केली जात होती. बिहार पोलिसांच्या आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये २५२६, २०१५ मध्ये ३०००, २०१६ मध्ये ३०७७० आणि नोव्हेंबर २०१७ पर्यंत ३४०५ तरूणांचं लग्न त्यांचं अपहरण करून जबरदस्ती लावण्यात आलं.