Railway Interesting Facts : सगळ्यांनीच आयुष्यात कधीना कधी रेल्वेने प्रवास केला असेलच. रेल्वेच्या प्रवासाचा अनुभव हा फारच वेगळा आणि रोमांचक असतो. कारण यात हजारो लोक तुमच्यासोबत असतात आणि खिडकीतून निर्सगाचं विहंगम दृश्य दिसतं. इतकंच नाही तर स्वस्तात तुम्ही तुमच्या ठिकाणावर पोहोचू शकता.
रेल्वेतून प्रवास करताना वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही साइन पाहिले असतील. यातील एक महत्त्वाचं साइन म्हणजे रेल्वेच्या शेवटच्या डब्यामागे असलेलं X साइन. तुम्हालाही कधीना कधी हा प्रश्न आला असेल की, या X चा नेमका काय अर्थ असावा?
भारतात प्रवासी रेल्वेच्या मागे पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाने X असा साइन असतो. हा साइन सर्वच प्रवासी रेल्वेच्या शेवटच्या डब्यामागे असतो. यासोबतच तुम्ही कधी हेही पाहिलं असेल की, काही रेल्वेवर एलव्ही असंही लिहिलं असतं. सोबतच रेल्वेच्या मागे लाल रंगाचा लाइटही ब्लिंक करत असतो.
रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर एलव्ही लिहिण्याचा अर्थ असा की, हा डबा रेल्वेचा शेवटचा डबा आहे. हा एलव्ही नेहमी X या साइनने लिहिला जातो. प्रत्येक रेल्वेच्या मागे X चा साइन हा कर्मचाऱ्यांसाठी संकेत असतो की, हा शेवटचा डबा आहे. जर एखाद्या रेल्वेच्या मागे असं लिहिलेलं नसेल तर याचा अर्थ हा होतो की, रेल्वे आपातकालिन स्थितीत आहे.
तसेच रेल्वेच्या मागे जळत असलेला लाल लाइट हा ट्रॅकवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी संकेत असतो की, रेल्वे त्या ठिकाणाहून पास झाली आहे, जिथे ते काम करत होते. हा लाइट खराब वातावरणात कर्मचाऱ्यांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करतो. तसेच या लाइटने मागून येणाऱ्या रेल्वेला सुद्धा इशारा मिळतो.