भारतात जेव्हा लहान मुलांना किंवा मोठ्यांनाही लघवीला जायचं असेल तर बरेचजण सू-सू असं म्हणतात. आपल्या देशात तर हा शब्द जवळपास सगळ्यांनाच माहीत असेल. पण जगातील काही देशांमध्ये याचा अर्थ काय आहे याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. अशात जर तुम्ही परदेशात कुठे फिरायला जाणार असाल तर तिथे सू-सू शब्दाचा अर्थ काय होतो हे माहीत असलं पाहिजे.
अज़रबैजान
या देशात सू-सू चा अर्थ पाणी पिणे असा होतो. बसला ना धक्का. जर तुम्हाला या देशात गेल्यावर पाणी प्यायचं असेल तर सू-सू म्हणालं लागेल.
बास्कयू
बास्कयूमध्ये या शब्दाचा अर्थ गोळी मारा गोळी मारा असा होतो. ही भाषा दक्षिण फ्रान्सच्या काही भागांमध्ये बोलली जाते. त्यामुळे इकडे गेले तर चुकूनही हा शब्द बोलू नका.
बॉसनियन
बॉयनियन भाषेत सू-सू चा अर्थ 'करत आहोत' असा होतो. म्हणजे इथे जर तुम्ही काही काम करत असाल तर त्या वाक्याच्या पुढे सू-सू जोडावं लागतं. ही भाषा बोस्निया आणि सर्बियाच्या काही भागांमध्ये बोलली जाते.
कोर्सीकन
कोर्सीकन भाषेत सू-सू चा अर्थ वर-वर होतो. ही एक रोमन भाषा आहे. जी फ्रान्स आणि इटलीच्या काही भागांमध्ये बोलली जाते.
ज़ेह
जेह भाषेत सू-सू चा अर्थ 'ते आहे' असा होतो. म्हणजे तुम्हाला कुणाकडे इशारा करायचा असेल तर सू-सू बोलावं लागेल. ही भाषा चेक रिपब्लिकमध्ये बोलली जाते.
दानिश
दानिश भाषेत सू-सू चा अर्थ गोपनिय असा होतो. ही भाषा जर्मनीच्या काही भागांमध्ये बोलली जाते. म्हणजे तुम्हाला इथे काही गुपीत ठेवायचं असेल तर त्यासाठी सू-सू म्हटलं जातं.
फ्रेंच
फ्रेंचमध्ये सू-सू चा अर्थ 'तुम्हाला माहीत आहे' असा होतो. ही भाषा फ्रान्ससोबतच जगाच्या अनेक भागांमध्ये बोलली जाते.
इंडोनेशियन
इथे सू-सू चा अर्थ दूध असा होतो. ही भाषा इंडोनेशियात बोलली जाते. म्हणजे इथे जर सू-सू म्हटलं तर याचा अर्थ होतो की, त्याला दुधासंबंधी काही बोलत आहे.