Meaning of T in T-shirt : रोजच्या दैनंदिन जीवनात आपण अशा अनेक गोष्टींचा वापर करतो ज्यांच्याबाबत बेसिक गोष्टीही आपल्याला माहीत नसतात. तुम्ही टी-शर्ट तर रोज वापरत असालच, टी-शर्ट घालण्यासाठी आरामदायक असते. आजकाल टी-शर्टचीच जास्त फॅशन आहे. टी-शर्टचे हे फायदे तुम्हाला असतीलच. पण टी-शर्ट म्हणजे T-Shirt या इंग्रजी शब्दात ‘T’ चा वापर का केला जातो हे तुम्हाला माहीत आहे का? जर माहीत नसेल तर आज आम्ही ते सांगणार आहोत.
टी-शर्ट (Meaning of T in T-shirt) शब्दाचं रहस्य तर जवळपास सगळ्याच लोकांना माहीत असेलच. द सन वेबसाइटच्या एका रिपोर्टनुसार सोशल मीडिया साइट टिकटॉकवर लोक बरेच व्हिडीओ पोस्ट करतात. ज्यात ते T-Shirt चं रहस्य सांगत आहेत. ज्यांना हे माहीत नव्हतं ते याबाबत जाणून घेतल्यावर अवाक् होत आहेत.
आकारामुळे पडलं नाव
T-Shirt ला Tee-Shirt असंही लिहिलं जातं. पण ‘T’ लिहिण्याचे जे कारण आहे त्याच्या 2 थेअरी फार कॉमन आहे. जेव्हा तुम्ही टी-शर्ट सरळ करता, जेव्हा त्याच्या बाह्या बाजूला जातात, तेव्हा त्याचा आकार इंग्रजी अक्षर ‘T’ सारखा दिसतो. यामुळे त्याला टीशर्ट असं म्हटलं जातं. सामान्यपणे टीशर्ट त्यांनाच म्हटलं जातं ज्या गोल गळ्याच्या असतात. त्यांना कॉलर नसते. तसेच ‘T’ मागे आणखी एक थेअरी आहे.
सैनिक घालत होते टीशर्ट
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा टीशर्ट्स बनवणं सुरू केलं तेव्हा त्या आर्मीतील जवान घालून ट्रेनिंग करत होते. ते त्यांच्या ड्रेसखाली टीशर्ट घालत होते आणि त्यातच फिजिकल ट्रेनिंग करत होते. याच कारणाने त्यांना ‘ट्रेनिंग शर्ट्स’ किंवा टी-शर्ट म्हटलं जाऊ लागलं. यूनाइटेड स्टेट्सच्या नेव्हीने 1913 च्या आसपास आपल्या नेव्हीच्या सैनिकांसाठी टीशर्ट्स बनवणं सुरू केलं.