देशात लाखो लोक रोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास सुविधाजनक आणि स्वस्त असल्याने लोकांना तो परवडतो. तुम्हीही कधीना कधी रेल्वेने प्रवास केला असेल. रेल्वेतून बाहेरचा सुंदर नजारा बघितला असेल. पण बऱ्याच लोकांना ज्या रेल्वेने ते प्रवास करतात त्याबाबत फार कमी माहिती असते. तुम्ही कधी लक्ष देऊन पाहिलं असेल तर तुम्हाला रेल्वेच्या डब्यावर बाहेरील बाजूस एक 5 आकडी क्रमांक लिहिलेला असतो.
हा क्रमांक पाहून तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, या क्रमांकाचा अर्थ काय आहे? नसेल केला तर आज आम्ही तुम्हाला याचा अर्थ सांगणार आहोत. रेल्वेच्या डब्यावर हा 5 आकडी क्रमांक ठळकपणे लिहिलेला असतो. याच्या सुरूवातीच्या 2 आकड्यांवरून या रेल्वेच्या निर्माणाचं वर्ष कळून येतं.
उदाहरणार्थ 03230 चा अर्थ होतो रेल्वेचा हा कोच 2003 मध्ये निर्मित कोच आहे, 07052 चा अर्थ होतो 2007 मध्ये निर्मित कोच किंवा 97132 चा अर्थ 1997 मध्ये निर्मित कोच होतो.
आता तुम्ही विचार करत असाल की, सुरूवातीच्या दोन आकड्यांबाबत तर सांगितलं. आता उरलेल्या तीन क्रमांकाच काय अर्थ आहे? चला जाणून घेऊ पुढच्या तीन क्रमांकाचा अर्थ काय आहे.
001 - 025 : AC प्रथम श्रेणीवर, वर्ष 2000/2001 मधील काही डबे किंवा कोच
026 - 050 : 1 AC + एसी - 2 टी
051 - 100 : AC - 2T म्हणजे एसी 2 टीअर
101 - 150 : AC - 3T म्हणजे एसी 3 टीअर
151 - 200 : CC म्हणजे एसी चेअर कार
201 - 400 : SL म्हणजे द्वितीय श्रेणी स्लीपर
401 - 600 : GS म्हणजे सामान्य द्वितीय श्रेणी
601 - 700 : 2S म्हणजे द्वितीय श्रेणी सिटींग/जनशताब्दी चेअर कार
701 - 800 : SLR सिटींग कम लगेच रॅक
801+ : पॅंटी कार, वीपीयू, आरएमएस मेल कोच, जनरेटर कार इत्यादी....
ज्या रेल्वेचा पहिला नंबर 0 ने सुरू होतो, ती रेल्वे स्पेशल रेल्वे असते. या सामान्यपणे होळीच्या वेळी किंवा उत्सवात चालतात. तेच एसी रेल्वेंबाबत सांगायचं तर त्यांची सुरूवात 1 नंबरने होते. या रेल्वे कमी अंतरावर चालणाऱ्या असतात. त्याऐवजी नंबर 2 असलेल्या रेल्वे जास्त लांब पल्ल्याच्या असतात.