Meaning of WAG WAP code on Railway Engine : देशातील जास्तीत जास्त लोक म्हणजे लाखोंच्या संख्येने लोक रेल्वेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास आरामदायक आणि स्वस्त असतो. त्यामुळे भारतात दिवसभरात शेकडो रेल्वे चालतात. तुम्हीही रेल्वेने प्रवास केला असेलच. अशात तुम्हाला रेल्वेच्या डब्यांवर वेगवेगळे कोड्स किंवा नंबरही दिसले असतील. पण अनेकांना या कोड्सचा अर्थ माहीत नसतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रेल्वेच्या इंजिनावर असलेल्या WAG, WAP, WDM या कोड्सचा अर्थ काय होतो हे सांगणार आहोत.
रेल्वेने बरेच लोक येतात-जातात. हे लोक रेल्वेच्या डब्यांवरील हे कोड्स बघतही असतात. पण ते काय आहेत हे क्वचितच कुणी जाणून घेत असतील. तसेच रेल्वेच्या इंजिनावरील हे WAG, WAP, WDM कोड्स आहेत. या तिन्ही कोड्सचा अर्थ वेगवेगळा होतो. मुळात रेल्वे लाइन तीन प्रकारच्या असतात. मोठी लाइन, छोटी लाइन आणि त्याहून लहान लाईन. रेल्वेच्या भाषेत मोठ्या लाइनला ब्रॉड गेज, छोट्या लाइनला मीटर गेज आणि त्याहून लहान लाइनला नॅरो गेज म्हटलं जातं.
रेल्वेची नॅरो गेज लाइन मुख्यपणे डोंगराळ भागात असतात. तिन्ही लाइनपैकी रेल्वेच्या ब्रॉड गेजसाठी W, मीटर गेजसाठी Y, नॅरो गेजसाठी Z चा वापर केला जातो. पहिलं अक्षर याचीच माहिती देतं. तर दुसरं अक्षर हे दर्शवतं की, इंजिन कोणत्या गेजचा वापर करून चालत आहे.
म्हणजे A आणि D या अक्षरांवरून इंजिन कशावर चालत आहे हे सांगितलं जातं. आणखी सोप्या भाषेत सांगायचं तर इंजिन डीझलवर चालत असेल तर D अक्षराचा वापर होतो. तेच A हे दर्शवतो की, इंजिन इलेक्ट्रिसिटीचा वापर करून चालत आहे.नंतर या कोड्समध्ये ‘P,’ G, ‘M,’ आणि ‘S’ सारख्या अक्षरांचाही वापर होतो. हे अक्षर दर्शवतात की, रेल्वेचा प्रकार कोणता आहे. उदाहरणार्थ P पॅसेंजर रेल्वेसाठी आणि G मालगाडीसाठी. तर M चा वापर दोन्ही गोष्टींसाठी म्हणजे पॅंसेंजर आणि मालगाड़ीसाठी केला जातो. तसेच S चा वापर शंटिंगसाठी केला जातो.
रेल्वे इंजिनावर लिहिलेला कोड WAG चा अर्थ वाइड गेज ट्रॅक होतो. हे एक एसी मोटिव पॉवर इंजिन आहे. जर इंजिनवर WAP असा कोड लिहिला असेल तर याचा अर्थ होतो की, AC च्या पॉवरवर वाइड गेज रूळांवर चालणारी पॅसेंजर रेल्वे.तसेच जर WAM लिहिलेलं असेल तर याचा अर्थ हे एसी मोटिव पॉवर इंजिन आहे. हे वाइड गेजवर चालतं आणि याचा वापर प्रवासी आणि मालगाडी दोन्ही रेल्वे खेचण्यासाठी केला जातो.
जर रेल्वेच्या इंजिनावर WAS लिहिलेलं असेल तर हे एसी मोटिव पॉवर इंजिन आहे आणि हे वाइड गेज ट्रॅकवर चालतं. याचा वापर शंटिंगसाठी केला जातो.