Space Nose and Lips: मानवी शरीर फारच आश्चर्यकारक आहे. शरीरातील अनेक गोष्टींबाबत लोकांना अजिबात काही माहीत नसतं. सामान्यपणे नाक, कान, ओठ, केस, नखे, बोटं, पाय, डोळे अशा अनेक अवयवांबाबत सगळ्यांनाच माहीत असतं. पण मानवी शरीरात नाव आणि ओठांच्या मधल्या भागाला काय म्हणतात? हे तुम्हाला माहीत आहे का?
आपल्या मानवी शरीरातील अनेक गोष्टींबाबत अजूनही माहीत नाही. शरीरातील असे अनेक भाग आहेत ज्यांना काय म्हणतात हे जास्तीत जास्त लोकांना माहीत नसतं. वैज्ञानिक सतत रिसर्च करत पृथ्वीबाबत अनेक गोष्टी जाणून घेत आहेत. तर अजूनही अनेक गोष्टी त्यांच्यासाठी कोड्यासारख्या आहेत. आजही त्यांना अनेक प्रश्नांची उत्तर माहीत नाहीत. अशाच एका प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
आपल्या शरीरात चेहऱ्यावरच वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक भागाला एक नाव आहे. जसे की, नाक, कान, मेंदू, डोळे इत्यादी. अशात सोशल मीडियावर एक प्रश्न व्हायरल झाला आहे जो तुमच्याही मनात कधीना कधी आला असेल. आपल्या चेहऱ्यावर नाक आणि ओठांच्या मधल्या भागाला काय म्हणतात?
मनुष्याच्या चेहऱ्यावर डोळे, कान, नाक, तोंड, ओठ, गाल आणि कपाळ हे सगळे अवयव दिसतात. पण नाक आणि ओठाच्या मधल्या भागाबाबत काही खास नाव वापरलं जात नाही. पण या भागालाही एक नाव आहे. मात्र, त्याचा वापर कुणी करत नाही. कारण त्यांना ते नावच माहीत नसतं.
दरम्यान, नाक आणि ओठांच्या मधल्या भागाला फिलट्रम म्हटलं जातं. हा एक इंग्रजी शब्द आहे आणि याचा असाच वापर केला जातो. हिंदीत याचा अर्थ ओष्ठ खात म्हणजे ओठांच्या आधीचा भाग. तसा तर हा शब्द तुम्ही वापरू शकता, पण लोक नक्कीच हैराण होतील.