What do Men Search the Most on Google: गुगल एक असं प्लॅटफॉर्म आहे ज्याचा वापर सगळे लोक करतात आणि त्यावर लोकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. तसे तर तुम्ही तुमची सर्च हिस्ट्री सहजपणे डिलीट करू शकता. पण तरीही बराच डेटा सेव्ह राहतो. ज्याचा वापर वेगवेगळ्या सर्व्हे आणि रिपोर्ट्ससाठी केला जातो. असाच एक रिपोर्ट समोर आला आहे. ज्यातून हे समजलं की, तरूणांनी आणि पुरूषांनी गुगलवर सर्वात जास्त काय सर्च केलं.
'फ्रॉम-मार्स डॉट कॉम' च्या रिपोर्टनुसार, ज्या गोष्टींबाबत पुरूष गुगलवर सर्वात जास्त सर्च करतात त्यातील एक आहे त्यांची सेक्शुअॅलिटी. रिपोर्टनुसार, दरवर्षी साधारण 68 हजार पुरूष हे सर्च करतात की, ते नपुंसक तर नाहीत ना. सोबतच तरूण गुगलला विचारतात की, शेव्हिंग केल्याने त्यांचे दाढीचे केस जास्त वाढतात की नाही आणि दाढीवर दाट केस येण्यासाठी काय करावे.
पुरूषांना हेही जाणून घ्यायचं असतं की, पोनी टेल ठेवल्याने किंवा टोपी घातल्याने त्यांच्या केसांवर काय परिणाम होतो. वर्कआउट रूटीन, बॉडी-बिल्डींग कशी करावी आणि कोणते प्रोटीन शेक्स प्यावे, या सर्व गोष्टी तरूण गुगलवर सर्च करतात.
ब्रेस्ट कॅन्सरबाबतही करतात सर्च
या रिपोर्टमधून एक आश्चर्यजनक खुलासा असाही झाला आहे की, पुरूषांच्या टॉप गुगल सर्चेसमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचाही समावेश आहे. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर जास्त आढळून येतो. पण हा कॅन्सर पुरूषांनाही होतो. त्यामुळे त्यांना हे जाणून घ्यायचं असतं की, त्यांनाही ब्रेस्ट कॅन्सर होतो का. होत असेल तर कसा आणि त्याची शक्यता किती हेही पुरूष सर्च करतात.
तरूणींबाबतही करतात सर्च
तरूण तरूणींबाबत गुगलवर खूप काही सर्च करतात. या रिपोर्टनुसार, तरूण गुगलवर सर्च करतात की, तरूणींना कशाप्रकारे इम्प्रेस केलं जाऊ शकतं, त्या आनंदी कशा होतात, त्यांना काय आवडतं आणि काय आवडत नाही. तरूणांना हेी जाणून घ्यायचं असतं की, लग्नानंतर तरूणी काय करतात.