२१ व्या शतकात जगात अनोखे आणि रहस्यमय अनेक किस्से ऐकायला मिळतात. हे जग रहस्यमय गोष्टींनी भरलेलं आहे. जगभरात आजही असे अनेक रहस्य आहेत जे उलगडले गेले नाहीत. अशातच आज आम्ही तुम्हाला एका अशा रहस्याबाबत सांगणार आहोत ज्यावर विश्वास ठेवणं अशक्य आहे. या रहस्याने जगातील मोठमोठ्या वैज्ञानिकांनाही चक्रावून सोडलं होतं.
आजपासून साधारण ६६ वर्षाआधी १९ ५५ मध्ये एका अशाच रहस्याने लोकांना हैराण केलं होतं. आज आम्ही तुम्हाला अमेरिकेतील एका अशा रहस्यमयी विमानाबाबत सांगणार आहोत ज्याने उड्डाण घेतल्यावर तब्बल ३० वर्षाने देशात लॅंड केलं होतं. आणि लॅंड केल्यावर काही वेळानेच पुन्हा ते गायब झालं होतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, २ जुलै १९५५ ला अमेरिकेतील न्यूयॉर्कहून मायामीसाठी Flight 914 ने उड्डाण घेतलं होतं. या विमानात एकूण ५७ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. पण न्यूयॉर्कहून मायामीला पोहोचण्याऐवजी आकाशातच ते गायब झालं होतं. अमेरिकेने त्यावेळी हे विमान शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते सापडलं नाही.
सध्या विमानाने न्यूयॉर्कहून मायामीला पोहोचण्यासाठी साधारण साडे तीन तासांचा वेळ लागतो. जर १९५५ बाबत सांगायचं तर तेव्हा न्यूयॉर्कहून मायामीला जास्तीत जास्त ५ तासात पोहोचता येत होतं.
अशात लोक तेव्हा अधिक हैराण झाले जेव्हा १९५५ मध्ये गायब झालेली Flight 914 ३० वर्षांनंतर ९ मार्च १९८५ मद्ये रहस्यमय पद्धतीने व्हेनिझुएलाच्या कारकास एअरपोर्टवर लॅंड झालं. यादरम्यान हैराण करणारी बाब ही होती की, एअर ट्रॅफिक कंट्रोलला या विमानाबाबत काहीच पूर्वसूचना नव्हती. पण लॅंडींगच्या काही वेळानंतर या विमानाने पुन्हा उड्डाण घेतली आणि आकाशात गायब झालं.
असं सांगितलं जातं की काराकास एअरपोर्टवर उतरल्यावर पायलटने तिथे उपस्थित स्टाफला विचारलं होतं की, हे कोणतं वर्ष सुरू आहे? जेव्हा ग्राउंड स्टाफने सांगितलं की हे १९८५ वर्ष आहे. तर विमानाचा पायलट मोठा श्वास घेऊ लागला होता आणि म्हणाला होता की, 'ओह माय गॉड. यानंतर विमानाने पुन्हा उड्डाण भरलं.
या रहस्यात किती सत्य आणि किती खोटं आहे हे सांगणं अवघड आहे. पण ९ मार्च १९८५ नंतर त्या विमानाबाबत काहीच माहिती मिळाली नाही. अमेरिका आजही या हरवलेल्या विमानाचा शोध घेण्यात लागला आहे.