काही घटना इतक्या विचित्र असतात की तुम्ही हसण्यावर कितीही कंट्रोल केला तरी करू शकत नाही. चोरी करणारे चोरी करून जातात पण एखादी चूक त्यांना पोलिसांच्या जाळ्यात अडकवते. अशीच एक गोष्ट गुजरातमध्ये घडली आहे. दारुचा साठा करणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहे. मात्र हसण्यासारखी गोष्ट तर पुढे आहे. ते त्यांच्याच गोठ्यातल्या म्हशीमुळे पकडले गेले आहेत. म्हशीने असे काही केले की दारुच्या साठेकऱ्यांना पोलिसांनी पकडलेच...ही घटना आहे गांधीनगर मधली. तेथील एका दुधाच्या व्यापाऱ्याने दारुच्या बाटल्या म्हशीच्या तबेल्यात लपवल्या. मात्र त्याचं नशीब वाईट होतं. त्याने जिथे त्या बाटल्या लपवल्या होत्या तिकडचं एका बाटलीचं झाकण उघडलं आणि म्हशींच्या पाण्यात दारु सांडली. इथे म्हशींनी ते दारु सांडलेलं पाणी प्यायलं. मग काय म्हणता! म्हशींना झाली नशा आणि म्हशी जोरजोराने हंबरायला लागल्या, दोर सोडून इकडे तिकडे पळायला लागल्या. या दारुच्या नशेमुळे बिचाऱ्या दोन म्हशी आजारी पडल्या.व्यापाऱ्याने प्राण्यांच्या डॉक्टरला बोलवलं. डॉक्टरने जनावरांची तपासणी केली तेव्हा त्याला काहीतरी विचित्र वाटू लागले. त्याने म्हशींच्या पाण्याचा रंग बघितला, पाण्याला विचित्र वासही येत होता. डॉक्टरने व्यापाऱ्याला विचारले असता झाडाच्या पानांमुळे तो रंग तसा झाला असावा असे उत्तर त्याला मिळाले. डॉक्टर म्हशींना औषधपाणी करून गेला खरा पण त्याने हा सर्व प्रकार पोलिसांच्या कानी घातला. झालं ना भावा! पोलिसांनी छापा टाकला आणि त्यात तब्बल ३५ हजाराची दारु सापडली. दारुच्या १०१ बाटल्या पोलिसांनी पकडल्या. पोलिसांनी या प्रकरणी गोठ्याच्या मालकांना दिनेश ठाकोर, अंबरम ठाकोर आणि रवि ठाकोर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
क्या बात! म्हशींमुळे झाली गुन्हेगार मालकाची पोलखोल, साठवली होती ३५ हजाराची बेकायदेशीर दारु
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2021 3:21 PM