Thirteen Digit Phobia : आकड्यांबाबत जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या मान्यता आहेत. कुठे एखादा आकडा शूभ मानला जातो तर कुठे अशुभ. जगभरात 13 नंबरला फार अशुभ मानलं जातं. यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जातात. ज्याबाबत अनेकांना माहीत नसतं.
जगभरात 13 नंबरला अशुभ मानलं जातं. त्यामुळे बरेच लोक या नंबरपासून दूर राहतात. इतकंच काय तर काही लोक तर या नंबरचा उच्चारही करत नाहीत. पण याची कारणे काय आहेत, हे जाणून घेऊ...
खासकरून पाश्चिमात्य देशांमध्ये याची भीती लोकांच्या मनात आहे. या देशांमध्ये 13 नंबरबाबत जेवढी भीती आहे, तेवढी कुठेही बघायला मिळणार नाही. पण याचं नेमकं कारण जाणून घ्याल तर तुम्हाला कदाचित त्यांच्या भीतीचं कारण कळेल.
थर्टीन डिजीट फोबिया
काही रिपोर्ट्नुसार, 13 तारखेला अशुभ मानलं जातं कारण एकदा येशु ख्रिस्तांसोबत एका व्यक्तीने विश्वासघात केला होता. ही व्यक्ती येशुंसोबत रात्री जेवण करत होती. ही व्यक्ती 13 नंबरच्या खुर्चीवर बसलेली होती. तेव्हापासून लोक या अंकाला अशुभ मानतात आणि तेव्हापासूनच लोक या अंकापासून दूर पळतात. मनोविज्ञानाने या 13 अंकाच्या भितीला ट्रिस्कायडेकाफोबिया किंवा थर्टीन डिजीट फोबिया असं नाव दिलं आहे. ही भीती लोकांमध्ये इतकी वाढली आहे की, लोकांना या अंकाचा वापरच बंद केला आहे.
परदेशात 13 अंकाची भीती
जर तुम्ही परदेशात कधी फिरायला गेलात आणि हॉटेलमध्ये थांबल्यावर 13 क्रमांकाची रूम किंवा इमारतीत 13 वा मजला दिसला नाही तर समजून घ्या की, मालक 13 अंकाला अशुभ मानतो. तुम्हाला अनेक लोक असेही दिसू शकतात जे हॉटेलमध्ये 13 नंबरची रूम घेणेही पसंत करत नाहीत. तसेच काही बार किंवा रेस्टॉरन्टमध्ये 13 नंबरचा टेबलही बघायला मिळत नाही.
भारतात 13 अंकाचा प्रभाव
13 अंकाची भीती केवळ पाश्चिमात्य देशांमध्येच नाही तर भारतातही बघायला मिळते. इथेही अनेक लोक या अंकाला अशुभ मानतात. चंदीगड हे शहर देशातील सर्वात युनियोजित शहर मानलं जातं. हे शहर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्वप्नातील शहर होतं. पण तुम्हाला हे माहीत नसेल की, या सुनियोजित शहरात सेक्टर 13 नाही. या शहराचा नकाशा तयार करणाऱ्या आर्किटेक्टने 13 नंबरचं सेक्टरचं बनवलं नाही. तो 13 अंकाला अशुभ मानत होता. या आर्किटेक्टला परदेशातून बोलवण्यात आलं होतं.