महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसला असून सर्वजण नाराज असल्याचे दिसून येत आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसून येतो. भारतात पेट्रोल-डिझेल आणि अगदी सीएनजीच्या किमती सातत्याने वाढत आहेत. लोक नाराज आहेत. अशा परिस्थितीत नोकरदार लोकांच्या नजरा आपल्या बॉसकडे असतात की पगार कधी वाढेल, प्रत्येक कर्मचारी आपल्या बॉसकडून अपेक्षा करतो आणि आपले काम चांगले दाखवतो जेणे करून चांगल्या कामाचा मोबदला मिळेल. याच दरम्यान, एका ब्रिटीश कंपनीच्या मालकाने आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला 750 पाउंड (74,251 रुपये) पेक्षा जास्त रक्कम दिल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे.
बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांची नेमकी समस्या जाणून घेऊन हे केलं आहे. जेम्स हिपकिन्स हे एमरीस टिंबर अँड बिल्डर्स मर्चंट्सचे व्यवस्थापकीय संचालक आहेत, जेव्हा त्यांना कळले की त्यांचे कर्मचारी महागाईमुळे त्यांचे वीज बिल भरू शकत नाहीत, तेव्हा त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मदत करण्याचा निर्धार केला. त्यांनी त्यांच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला 750 युरो (74251 रुपये) दिले.
60 कर्मचाऱ्यांमध्ये पैसे वाटण्यात आले
जेम्स हिपकिन्सने उशीर न करता £45,000 (37,02,105.00 रुपये) काढले आणि ते त्याच्या 60 कर्मचाऱ्यांमध्ये वाटले. जेम्सने सांगितले की, जेव्हा प्रत्येकजण अडचणीचा सामना करत होता तेव्हा आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कर्मचार्यांना अशी भेट मिळेल याची कल्पनाही केली नव्हती. ते आनंदी झाले. ते म्हणतात जर तुमचा तुमच्या लोकांवर विश्वास असेल तर त्यांची काळजी घ्या. वाईट काळात तुम्ही फक्त स्वतःबद्दल विचार करू शकत नाही.
चांगला बॉस होण्याचा अर्थ सांगितला
जेम्स म्हणाले, आम्ही कंपनी म्हणून जे काही करत आहोत त्या लोकांसोबत शेअर करताना आनंद होत आहे ज्यांनी कंपनी यशस्वी केली आहे. ते असे लोक आहेत ज्यांच्यामुळे आम्ही यश मिळवू शकलो आणि कंपनीला फायदेशीर बनवू शकलो. ते पुढे म्हणाले की, एक चांगला बॉस तो असतो जो चांगले परिणाम आणि चांगल्या आकृतीवर लक्ष केंद्रित करण्यासोबतच लोकांना पुढे जाण्याची संधी आणि चांगले वातावरण देतो. जिथे कामासाठी चांगले वातावरण असते तिथे लोकांना जास्त वेळ घालवायला आवडते. यामुळे उत्पादकता वाढते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.