गेमिंगची नशा काय असते हे तुम्ही ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल. काही लोकांना गेमिंगची अशी काही सवय लागते की, त्यांना नवीन टास्क असणारे गेम हवेच असतात. त्यासाठी ते वाट्टेल ते करतात. एकाने गेमिंगच्या वेडापाई जे केलं ते वाचून तुम्ही थक्क व्हाल. एका तरूणाने त्याच्या हनीमूनसाठी जमा केलेले पैसे गेमिंग पीसी खरेदी करण्यात खर्च केलेत. त्याने साधारण यात ६ लाख रूपये खर्च केलेत.
इंडिया टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ही माहिती एक रेडीट यूजरने शेअर केली आहे. त्याने सांगितले की, गेल्या डिसेंबरमध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता. जानेवारीमध्ये दोघांनीही त्यांच्या हनीमूनसाठी पैसे जमवणे सुरू केले. दोघांनी साधारण ८ हजार डॉलर इतकी रक्कम जमा केली. यादरम्यान तरूणाच्या मित्राने नवीन गेमिंग पीसी खरेदी केला. या तरूणाने त्याच्या होणाऱ्या पत्नीला विचारले की, गेमिंग पीसी घेऊ का? तर तिने स्पष्ट नकार दिला. तसेच ती म्हणाली की, आपल्याकडे लॅपटॉप असताना गेमिंग पीसी कशाला हवा.
तिने पुढे लिहिले की, एका आठवड्यानंतर तो पीसी घेऊन आल. इतकेच काय तर एक नवीन टेबल आणि खुर्चीही ऑर्डर केली. एका रात्री त्याच्या होणाऱ्या पत्नीने त्याला विचारले की, इतके पैसे कुठून आलेत. तर त्याने सगळं सेव्हिंग जे ८ हजार डॉलरच्या आसपास होतं सगळं खर्च केलं.
तिने सांगितले की, आता तिचा होणारा पती दिवसरात्र गेमिंग खेळत असतो. इतकेच काय त्याला झोपेचीही काही चिंता नाही, दोघांमध्ये बोलणंही होत नाही. ती म्हणाली की, अलिकडे मला असं वाटतं की, मी त्याची वेट्रेस आहे. २ ते ३ आठवड्यांपासून आमच्यात काही बोलणं झालं नाही. तो घरातील काही कामही करत नाही'.
तिने सांगितले की, 'मी याबाबत माझ्या आई-वडिलांशी बोलले. ते गप्प होते. आता मला वाटतं मी त्याचा पीसी जाळून टाकावा. मला फार भीती वाटते की, एक दिवस त्याची नोकरीही त्याच्या हातून जाईल'.
आता मी काय करावं? अशी विचारणा तिने सोशल मीडियातील लोकांना केली आहे. त्यावर लोकांनी वेगवेगळे उपाय सुचवले आहेत. काही म्हणाले की, त्याला जागेवर जेवणं देणं बंद कर तर काही म्हणाले की, त्याच्याशी याबाबत बोल. तर एकाने सांगितले की, पीसीचा पासवर्ड चेंन्ज कर.