Gold On Earth : सोनं पृथ्वीवरील सगळ्यात महागड्या धातुंपैकी एक आहे. पण कधी तुम्ही विचार केला का की, पृथ्वीवर सोनं आलं कुठून? खाणींमध्ये सोनं पोहोचलं कसं? कधी समजलं की, सोनं महागड्या धातुंपैकी एक आहे? याबाबत सायंटिस्ट काय म्हणतात? पृथ्वीवर किती सोनं आहे? चला जाणून घेऊ याबाबत...
ऑनलाईन प्लॅटफॉर्म 'कोरा'वर हा प्रश्न विचारण्यात आला. अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे वैज्ञानिक अनेक वर्षांपासून यावर अभ्यास करत होते. पण जे निष्कर्ष समोर आले ते हैराण करणारे होते. ‘एस्ट्रोनॉमी’ मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, वैज्ञानिक म्हणाले की, जेव्हा पृथ्वी तयार झाली तेव्हा इथे सोनं नव्हतं. यानंतर दशकांपर्यंत अनेक उल्कापिंड पृथ्वीवर धडकत राहिले. साधारण 4 बिलियन वर्षाआधी पृथ्वीवर मीटराइड्स पडले. तेच आपल्यासोबत सोनं आणि प्लॅटिनम घेऊन आले. जेव्हा यांची धडक झाली त्याला सायन्सच्या भाषेत लेट अक्रीशन म्हटलं जातं. तेव्हा चंद्राच्या आकाराचे पिंड पृथ्वीला धडकले होते. त्यांच्यासोबत अनेक खनिज पदार्थही आले.
पृथ्वीवर किती आहे सोनं?
वैज्ञानिकांनी सांगितलं की, पृथ्वीच्या एकूण भाराच्या साधारण 0.5 टक्के वजन याच उल्कापिंडांच्या धडकण्याने आलं. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, पृथ्वीवर इतकं सोनं आहे की, जर सगळं एका जागी ठेवलं तर पृथ्वी 12 टक्के भरली जाऊ शकते. सध्या जेवढं सोनं वापरलं जात आहे त्याचं 75 टक्के सोनं गेल्या शतकात काढण्यात आलं. अजूनही खूप सोनं पृथ्वीच्या गर्भात दडलं आहे. वैज्ञानिकांनुसार, जेवढे खोल जाल तेवढं जास्त सोनं मिळेल.
चंद्र बनल्यानंतर झाला बदल
वैज्ञानिकांचं असंही मत आहे की, चंद्र बनल्यानंतर असे उल्कापिंड पृथ्वीवर धडकनं खूप वाढलं होतं. पण 3.8 अब्ज वर्षाआधी अचानक अंतराळात काहीतरी बदल झाल्याने ते पृथ्वीवर पडणं थांबलं. त्यासोबत खनिज पृथ्वीवर येऊन पडणंही बंद झालं. एक काळ होता जेव्हा भारतीय सोनं खरेदीत पहिल्या नंबरवर होते. पण आता चीन पहिला नंबर आणि भारत दुसरा झाला आहे. भारतात सोनं जास्त दागिण्यांच्या रूपात वापरलं जातं आणि चीनमध्ये याचा वापर इन्व्हेस्टमेंट म्हणून केला जातो.