भारतात अगदी काणाकोपऱ्यापर्यंत रेल्वे नेटवर्क पसरले आहे. अनेक ठिकाणी ट्रान्सपोर्टची साधने नसतील, पण रेल्वे नेटवर्क सहजपणे दिसेल. कमी पल्ल्याच्या रेल्वे असोत अथवा लांब पल्ल्याच्या, इंडियन रेल्वे आपल्या प्रत्येक पेसेन्जरला सुविधा पुरवत असते. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक रेल्वेमध्ये बाथरूमची व्यवस्था असतेच असते.
आपण पाहिलेच असेल की, यापूर्वी रेल्वेतील बाथरूमचे चेम्बर खुले असत. यामुळे प्रवासी टॉयलेटला गेल्यानंतर, संर्व घाण पटरीवरच पडत होती. यामुळे रेल्वेला मोठे नुकसान होत होते. याशिवाय हे पर्यावरणाच्या दृष्टीनेही वाईट होते. खुल्यावरील शोचास अद्यापही बंदी आहे. मात्र रेल्वेंमुळे पटरिवरच मानवाची विष्ठा आणि मुत्र पडत होते. ही समस्या सोडविण्यासाठी इंडियन रेल्वेने जबरदस्त जुगाड केला आहे.
ओपन डिस्चार्ज सिस्टिम बॅन -पूर्वी ट्रेनमध्ये ओपन डिस्चार्ज सिस्टिम होते. यामुळे प्रवाशांचे मलमूत्र थेट पटरीवरच पडत होते. यातही, रेल्वे जेव्हा एखाद्या स्टेशनवर थांबत होती तेव्हा तर अधिकच दुर्घंदी पसरत होती. यावर उपाय म्हणूण कंट्रोल डिस्चार्ज सिस्टिम सुरू करण्यात आली. यामुळे, रेल्वे 30 च्या स्पीडवर आली की, मल-मूत्र डंप होत होते. यामुळे स्थानके तर स्वच्छ राहू लागली, मात्र पटऱ्यांवरील घाण तशीच राहत होती.
आता वापरली जाते ही खास सिस्टिम -रेल्वेच्या या समस्येवर DRDO ने एक खास उपाय शोधून काढला. इंडियन रेल्वेने डीआरडीओच्या साथीने भारतीय रेल्वेमध्ये बायो टॉयलेट लावले. यात मानवी मल-मूत्र एका चेम्बरमध्ये जमा केले जाते. या चेम्बर्समध्ये काही असे बॅक्टेरिया असतात, जे मानवी मल-मूत्राचाचे रुपांतर पाण्यात करतात. या मल-मूत्राचा सॉलिड भाग कुठल्याही दूर्गंधीशिवाय एका वेगळ्या चेम्बरमध्ये जातो. यानंतर तो तेथून काढून डंप केला जातो. या वेस्टेजपासून जे पाणी तयार होते, त्याचा पुनर्वापर केला जातो.