Coconut Water : निसर्गाची करणी अन् नारळात पाणी, असा वाकप्रचार आपण सर्वांनीच ऐकलेला असतो. कदाचित अनेकांना याबाबत कुतूहलही असतं की, नारळात पाणी येतं कसं? पण सगळेच विचार करून सोडून देतात. मात्र, हा खरंच अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय आहे की, नारळात पाणी येतं कसं?
अनेकदा असं होतं की, लहान मुलेही त्यांच्या सवयीप्रमाणे नारळात पाणी कुठून येतं? असं विचारून जातात. पण त्यावेळी अनेकांकडे याचं नेमकं उत्तर नसतं. आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत.
quora.com वर ज्योत्सना बिश्नोई आणि उषा जैन-भटनागर यांनी माहिती दिली की, मुळात नारळात जे पाणी असतं त्याला नारळाच्या झाडाचं endosperm असं म्हटलं जातं. हे पाणी मुळांमधून उलट्या दिशेने वर शोषलं जातं. जे भ्रूणाच्या म्हणजेच नारळाच्या angiosperm मध्ये विकासावेळी आणि fertilasation नंतर इंडोस्पर्म nucleus मध्ये रुपांतरित होतं.
कच्च्या नारळात जे इंडोस्पर्म असतं ते nuclear type असतं. तसंच ते रंगहीन रूपात असतं. ज्यात अनेक nuclei तरंगत असतात. भ्रूण कोशात(नारळाच्या आत) हा तरल पदार्थ भरलेला असतो. यातच भ्रूणाचा विकास होतो. नंतरच्या अवस्थेत अनेक nuclei सेल्जसोबत मिळून नारळाच्या आतल्या बाजूला जमा होत जातं. नंतर याचा एक पांढरा जाड थर तयार होत जातो. हेच नंतर खोबरं म्हणून तयार होतं.
यात Free nuclei असल्याने हे फारच पोषक असतं. दुधापेक्षा अधिक प्रोटीन नारळात असतं. तसेच यात सर्वाधिक पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम सुद्धा असतं.
अनेक झाडांप्रमाणे नारळाचं झाड पाणी संचय करून ठेवण्यासाठी आपल्या फळांचा वापर करतं. हे पाणी झाडाच्या मुळातून एकत्र केलं जातं. नंतर कोशिकांद्वारे फळात जातं. इतर फळांमधून हे पाणी काढण्यासाठी फळांना पिळलं जातं. जे रसाच्या रूपात वापरलं जातं. पण नारळात हे पाणी आत असतं.