जगात वेगवेगळ्या प्रकारचे कोट्यावधी जीव आहेत. पण असे अनेक जीव असतात जे आपण नेहमीच बघतो पण त्यांच्याबाबत आपल्याला फारच कमी माहिती असते किंवा असं म्हणूया की त्यांच्याबाबत आपल्याला काहीच माहीत नसतं. अशात जर आम्ही तुम्हाला विचारलं की, कोणत्या जीवाचे कान चेहऱ्यावर नाही तर त्यांच्या पायात असतात? तर याचं उत्तर क्वचितच तुम्हाला माहीत असेल. आज याच जीवाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
टोळ हा जीव तुम्ही अनेकदा पाहिला असेल. याच्याबाबतची एक वेगळी बाब आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. नॅशनल जिओग्राफी आणि सायंटिफिक अमेरिकन वेबसाईटनुसार, टोळ या कीटकाचे कान त्यांच्या पायाजवळ असतात. त्यांचे कान गुडघ्याच्या जरा वर असतात.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, टोळांचे कान त्यांच्या समोरच्या पायांमध्ये असतात आणि त्यात चार ध्वनी इनपुट असलेलं एक ध्वनी रिसीव्हर असतं. याद्वारे ते बाहेरचा आवाज ऐकतात.
टोळांबाबत आणखीही काही खास गोष्टी आहेत. जसे की, टोळ हे नेहमी घोळक्याने म्हणजे ग्रुपने फिरतात आणि ते सगळेच एका दिवसात हजारो वयस्क लोकांचं अन्न संपवू शकतात. तुम्हाला माहीत नसेल, पण आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेच्या काही भागांमध्ये लोक टोळ खातात.
टोळ त्यांचे पाय एकमेकांना घासून ध्वनी निर्माण करतात. यांच्याबाबत सगळ्यात आश्चर्यकारक बाब म्हणजे हे जीव २०० मिलियन वर्षांआधीपासून पृथ्वीवर आहेत. फॉसिक रेकॉर्ड सांगतात की, पहिल्यांदा टोळ ३०० मिलियन वर्षाआधी दिसले होते म्हणजे ते पृथ्वीवरील सगळ्यात प्राचीन जीवांपैकी एक आहेत.