आजकाल वेगवेगळ्या देशांमध्ये स्वच्छ पाणी पिण्यासाठी लोकांना खूप मेहनत घ्यावी लागत आहे. लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे. अशात वर्ल्ड ऑफ स्टेटिसटिक्सने अशा देशांची यादी जाहीर केली आहे जिथे लोक सगळ्यात स्वच्छ पाणी पितात.
वेगवेगळ्या देशांमध्ये पिण्या लायक पाणी संपत आहे. पण जगात असेही काही देश आहेत ज्यांना पिण्याच्या पाण्यासाठी काहीच मेहनत घ्यावी लागत नाही. त्या देशांचे नाव आज आपण जाणून घेऊ.
या देशांच्या यादीत सगळ्यात पहिलं नाव येतं ते फिनलॅंड, आइसलॅंड, नेदरलॅंड, नॉरवे, स्वित्झर्लंड आणि यूनायटेड किंगडम. या देशांमध्ये पिण्याचं सगळ्यात स्वच्छ पाणी मिळतं.
तुम्हाला वाचून धक्का बसेल की, या देशांच्या यादीत भारताचा नंबर 139वा आहे. तेच पाणी पिण्याबाबत भारताचा नंबर 10वा आहे. सगळ्यात स्वच्छ पाणी मिळणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तान भारतामागे आहे. त्यांना या यादीत 144वं स्थान मिळालं आहे.
भारतात स्वच्छ पाणी मिळणं ही एक मोठी समस्या बनली आहे. लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाहीये तर काही ठिकाणी लोकांना पाणीच मिळत नाहीये. अशात लोक दुषित पाणी पिऊन आजारी पडतात.