परदेशात जाण्यासाठी किंवा दूरचा प्रवास काही तासांत करण्यासाठी विमान, हे एकमेव साधन आहे. विमानाचा प्रवास अनेकांना आवडतो आणि अनेकांची विमान प्रवासाची इच्छाही असते. पण, विमान प्रवास असुरक्षितही मानला जातो. बस, ट्रेन आणि खासगी वाहनांचे अपघात होतात, पण त्यात जीव वाचण्याची वाचण्याची शक्यता आहे. मात्र, विमान कोसळले तर प्रवाशांचा जीव वाचण्याची शक्यता फार कमी आहे.
यासंदर्भात एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये विमानातील सर्वात सुरक्षित सीट कोणते, ते सांगण्यात येत आहे. म्हणजेच विमानाचा अपघात झाला, तरीदेखील कोणत्या सीटवर बसलेल्या प्रवाशांचे प्राण वाचू शकतात, याची माहिती मिळतीये. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल. पण ही गोष्ट एकदम खरी आहे. विमानातील सीटनुसार कोणत्या सीटवर बसून विमान अपघातात वाचण्याची आणि न वाचण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे, हे ठरते.
शास्त्रज्ञांनी हा प्रयोग केलाविमानातील सर्वात सुरक्षित सीट शोधण्यासाठी 2012 मध्ये मेक्सिकोतील काही शास्त्रज्ञांनी प्रयोग केला होता. यात जाणूनबुजून एक विमान कोसळण्यात आले. क्रॅश करण्यासाठी बोईंग 727 या विमानाची निवड करण्यात आली. हे विमान वाळवंटात क्रॅश केले गेले. कोणत्या सीटवर बसलेला प्रवासी विमान अपघातातून बचावू शकतो, हे या प्रयोगातून समोर आले.
ही सीट करा बुक तुम्हाला विमान अपघाताची भीती असेल आणि सुरक्षित सीट बुक करण्याचा विचार करत असाल, तर नेहमी विमानाच्या शेवटच्या भागात असलेली सीट नेहमी बुक करा. विमानाची मागील सीट अपघातांमध्ये सर्वात सुरक्षित मानली जाते. विमानाच्या समोर बसलेले लोक आणि पंखांजवळ बसलेल्या प्रवाशांचा अपघातात मृत्यू होण्याचा सर्वाधिक धोका असतो. पण विमानाच्या मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांचा जीव वाचण्याची सर्वाधिक शक्यता असते.