मुंबई - सध्या देशात चहाचा व्यवसाय सर्वाधिक चालतो. देशात असे अनेक ब्रँड तयार झाले आहेत, जे चहाचे विकून भरपूर कमाई करत आहेत. त्याचबरोबर देशातील युवकही छोटे व्यवसाय करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खूप बदल घडवून आणत आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही दोन तरुणांनी चहाचा व्यवसाय सुरू केला असून, हा व्यवसाय सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही तरुण ३ कोटींच्या कारमधून चहा विकतात.
देशात चहाचे स्टार्टअप मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहेत. लोकांच्या वेगवेगळ्या कल्पनाही समोर आल्या, ज्या खूप लोकप्रिय झाल्या. अशाच एका कल्पनेने आज आर्थिक राजधानी मुंबईत दोन तरुण चहा विकत आहेत. त्यांच्या कामाची खूप चर्चा होत आहे. हे दोन तरुण ऑडी कारमध्ये चहा विकतात. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
'ऑडी चहावाला' ही संकल्पना अमित कश्यप आणि मन्नू शर्मा यांनी सुरू केली आहे. या दोन्ही तरुणांनी मुंबईतील लोखंडवाला बॅकरोड येथे चहाचा स्टॉल लावला आहे. दोघांनीही मार्केटिंगचे वेगवेगळे प्रकार डोळ्यासमोर ठेवून हे काम सुरू केले आहे. एका नवीन आणि वेगळ्या मार्केटिंग धोरणाचा भाग म्हणून ऑडी वापरत असल्याचे या तरुणांनी सांगितले.
दोन्ही तरुण हरियाणाचे अमित कश्यप आणि मन्नू शर्मा हे दोघे मूळचे हरियाणाचे रहिवासी आहेत. काही महिन्यांपूर्वी हे दोघे मुंबईत आले होते. दोघांनी इथे येऊन काहीतरी वेगळं काम सुरू करावं असा विचार केला. यानंतर अमित आणि मन्नू यांनी मुंबईतील लोकांना हरियाणातील चवीचा चहा विकण्याचा निर्णय घेतला आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी तीन कोटी रुपयांच्या गाडीत चहा विकण्यास सुरुवात केली. मुंबईतल्या या चहा विक्रेत्यांवर लोक खूप प्रेम करत आहेत. ऑडी चहावालाच्या स्टॉलवर लोकांची कायम गर्दी असते.