Burj Khalifa owner : दुबईचा विषय निघाला की, सगळ्यात आधी सगळ्यांच्या डोळ्यांसमोर येते ती बुर्ज खलीफा इमारत. जगातील सगळ्यात उंच इमारत अशी याची ख्याती आहे. ही इमारत बांधण अर्थात अवघड होतं. तरीही ती पूर्ण झाली आणि जगभरातील लोकांनी यात घरे घेतली. यात काही बॉलिवूड कलाकारांचाही समावेश आहे. तुम्हीही कधीना कधी या इमारतीचे फोटो किंवा व्हिडीओ पाहिले असतील. पण तुम्हाला माहीत असलेली ही इमारत कुणी बांधली किंवा याचा मालक कोण हे तुम्हाला माहीत नसेल. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
जगातील सगळ्यात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलीफाचा मालक कोण हे जाणून घेण्याआधी या इमारतीबाबत काही गोष्टी आपण जाणून घेऊ. एका रिपोर्टनुसार, २००४ मध्ये या इमारतीचं बांधकाम सुरू झालं होतं. याची उंची ८२८ मीटर आहे आणि यात एकूण १६३ मजले आहेत. २०१० मध्ये या इमारतीचं उद्घाटन झालं होतं. त्याशिवाय बुर्ज खलीफा इमारतीच्या नावावर ८ वर्ल्ड रेकॉर्ड आहेत.
कोण आहे इमारतीचा मालक?
एमआर प्रॉपर्टीज कंपनी या इमारतीची मालक आहे. याचा चेअरमन मोहम्मद अलबर आहे. ही इमारत तीन कंपन्यांनी मिळून तयार केली आहे. ज्यात साऊथ कोरिया दिग्गज कंपनी सॅमसंग सी अॅंड टी, बेल्जियमची बीसिक्स आणि संयुक्त अरब अमीरातमधील अरबटेकटा समावेश आहे.
महत्वाची बाब म्हणजे बुर्ज खलीफा इमारत पर्यावरणाच्या दृष्टीनेही बनवण्यात आली आहे. दरवर्षी इमारतीमध्ये १५ मिलियन गॅलन पाणी सस्टेनेबल पद्धतीने जमा केलं जातं. हे पाणी झाडांसाठी वापरलं जातं. आणखी एक बाब म्हणजे बुर्ज खलीफा इमारतीचं टोक ९५ किलोमीटर दुरूनही दिसतं.