पूर्वी जमिनीला फार भाव नव्हता. आताही मध्यम वर्गीय व्यक्ती मोठ्या मुश्किलीने जीवनात प्रॉपर्टीच्या नावावर जमीन खरेदी करतो. त्यावर घर बनवतो. शहरांमध्ये आता तर जमिनींचे भाव आकाशाला भिडले आहेत. पण काय तुम्हाला माहीत आहे की, जगात सगळ्यात जास्त जमीन कोणत्या व्यक्तीकडे आहे? जगात एक अशी व्यक्ती आहे ज्याच्याकडे जगातील 16 टक्के जमीन आहे. त्याच्याकडे या जमिनीचा मालकी हक्क आहे. त्यामुळे तो जगातील सगळ्यात जास्त जमीन असलेला व्यक्ती आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'कोरा' वर किंवा इतरही ठिकाणी असे प्रश्न नेहमीच विचारले जातात. कोरावर नुकताच हा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी उत्तरे दिली. काहींनी देशांची नावे सांगितली. कुणी चीन म्हणालं तर कुणी रशिया तर कुणी अमेरिका. पण हे उत्तर चुकीचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कुणाकडे आहे सगळ्यात जास्त जमीन?
इन्सायडर आणि इतर काही वेबसाइट्सवर याबाबत माहिती दिली आहे. आणि काही रिपोर्टनुसार, या प्रश्नाचं उत्तर आहे इंग्लंड शाही परिवार. इंग्लंच्या शाही परिवाराकडे सगळ्यात जास्त जमीन आहे. ही सगळी जमीन आधी क्वीन एलिजाबेथ यांच्या नावावर होती. त्यांच्या मृत्युनंतर ही जमीन त्यांचा मुलगा आणि ब्रिटनचा राजा चार्ल्स तृतीय यांच्या नावावर झाली. ही जमीन भलेही त्यांच्या नावावर आहे पण याचे ते एकटे मालक नाहीत.
ते या जमिनीचे मालक तोपर्यंत राहतील जोपर्यंत ते राजा आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, जगभरात त्यांच्या नावावर 660 कोटी एकर जमीन आहे. ही जमीन ग्रेट ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, आयरलॅंड, स्कॉटलॅंड, वेल्स, कॅनडा अशा इतरही काही देशांमध्ये आहे.
अशाप्रकारे राजा चार्ल्स हे जगातील 16 टक्के संपत्तीवर राज्य करतात. क्राउन इस्टेट नावाची एक संस्था या प्रॉपर्टीची देखरेख करतात. जेव्हा चार्ल्स यांनी कार्यभार हाती घेतला तेव्हा ते 3 लाख कोटी रूपयाच्या संपत्तीचे मालक बनले होते.