जगात मानवी प्रवासाचा सगळ्यात वेगवान मार्ग म्हणजे हवाई वाहतूक. ऊन, थंडी, वारा अशा गोष्टींवर मात करत विमानं प्रवास करतात. अशा विमान प्रवासावर प्रभाव टाकणारा ऋतु म्हणजे पावसाळा. अनेकदा पावसाळ्यात पाऊस कोसळत नसला तरी विजा कडाडत असतात. काही ठिकाणी वीज कोसळते देखील. अशावेळी सुद्धा विमान प्रवास सुरू असतो. मग, विमानाला विजेचा शॉक बसतो का? हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. तर याचं उत्तर आहे नाही. कोरा या प्रश्नोत्तराच्या साईटवर या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं आहे.
विमानाला शॉक न बसण्याचं कारण, विमानाचे बाहेरचे आवरण विद्युतवाहक धातूचे असते. शिवाय थोडे खाली अशाच धातूचे जाळे बसवलेले जाते असते. विमानाचा आकार पुढे आणि मागे निमुळता असतो. वादळात चमकणाऱ्या वीजांचा विमानाला स्पर्श झाल्यावर विद्युत प्रवाह बाहेरच्या बाहेर विमानाच्या नाकाच्या, शेपटीच्या आणि पंखांच्या टोकांपर्यंत नेला जातो व तिथून आसमंतात परत जातो. त्यासाठी विमानाच्या टोकांवर वीज आकाशात सोडणारे discharger wicks बसवलेले असतात. विमानाच्या बाह्य आवरणातून विजेला आत यायला रस्ताच नसतो. हे उच्च कोटीचे इंजिनियरिंग असते आणि याची कसोशीने तपासणी होते.
विमानाचा विजेपासून बचाव हा त्यावर लावलेल्या कडेकोट आवरणावर अवलंबून आहे. आणि त्याची कसोशीने तपासणी महत्त्वाची आहे. आवरणामुळेच विमान सुरक्षित राहते. तसेच नाजुक उपकरणे, होकायंत्र हे देखील सुरक्षित राहतात.सिडीटी