शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पुरुष हवेत कशाला?- मेरीचा ‘नाला क्लब’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2022 8:45 AM

मेरी न्गुगी ही केनियाची स्टार ॲथलिट! मागच्या वर्षीच्या बोस्टन मॅरेथॉनची रजतपदक विजेती रनर. त्याशिवाय इतर काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये बक्षिसं ...

मेरी न्गुगी ही केनियाची स्टार ॲथलिट! मागच्या वर्षीच्या बोस्टन मॅरेथॉनची रजतपदक विजेती रनर. त्याशिवाय इतर काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये बक्षिसं तिच्या नावावर आहेत, पण सातत्याने जगातले सर्वोत्तम धावपटू देणाऱ्या केनियात ही काही तिची सगळ्यात महत्त्वाची ओळख नाही. आजघडीला तिची सगळ्यात महत्त्वाची ओळख आहे ती म्हणजे तिने केनियातील पहिलं ‘केवळ महिलांसाठी’ असलेलं प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आहे.तिने काही आठवड्यांपूर्वीच महिलांसाठी ‘नाला ट्रॅक क्लब’ सुरू केला आहे. खरं म्हणजे केनियामध्ये धावपटूंना प्रशिक्षण देणारे अनेक प्रशिक्षक आणि क्लब्ज आहेत. मग हा केवळ महिलांसाठी असलेला क्लब मेरीला का सुरू करावासा वाटला असेल? 

- त्यामागचं कारण फारच दुर्दैवी आहे. मागच्या वर्षी मेरीच्या बरोबरची २५ वर्षांची एक आंतरराष्ट्रीय धावपटू ऍग्नेस टायरप हिचा खून झाला. तीही केनियाची मोठी धावपटू होती. तिला विश्वविजेतेपद स्पर्धेत दोन वेळा पदक मिळालेलं होतं. ‘फक्त महिलांच्या’ १० किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेचा विश्वविक्रम तिच्या नावावर होता. त्यानंतर अनेक दिवसांनी इब्राहिम रॉटिक या तिच्या नवऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्याने तो आरोप नाकारला आणि त्याबद्दलची केस कोर्टात सुरू आहे. मात्र, त्या निमित्ताने केनियामधील लिंगाधारित गुन्ह्यांचं प्रमाण हा विषय समाजासमोर आला. महिलांवर होणारा अन्याय आणि अत्याचार थांबवण्याची चळवळ केनियात उभी राहिली.या चळवळीच्या निमित्ताने जी वैचारिक घुसळण झाली त्यात मेरी न्गुगीच्या लक्षात आलं की, तिने आजवर अनेक प्रशिक्षकांकडे प्रशिक्षण घेतलं होतं. मात्र, त्यात एकही महिला नव्हती. प्रशिक्षक या पदावरच्या व्यक्तीच्या हातात फार जास्त सत्ता असते. आपल्याकडे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य घडवण्याची किंवा बिघडवण्याची पूर्ण क्षमता त्याच्याकडे असते. एखादा प्रशिक्षक जर त्याच्या महिला धावपटूंकडे  वाईट नजरेने बघत असेल तर त्याला तो गुन्हा करणं सहज शक्य होऊ शकतं.टायरपच्या मृत्यूनंतर २०२२ सालच्या सुरुवातीला केनियाच्या क्रीडा मंत्रालयाने देशातील महिला खेळाडू आणि त्यांच्या बाबतीत होणारा भेदभाव याबद्दलचा एक अहवाल जाहीर केला. हा अहवाल माजी मॅरेथॉनपटू कॅथरीन एन्डेरेबा हिने संकलित केला होता. त्यात असं लिहिलं होतं, की महिला खेळाडूंच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात भेदभाव केला जातो. मात्र, तो कधीच जगजाहीर होत नाही. कोणी त्याविरुद्ध तक्रार करीत नाही, की कोणी त्याचा अहवाल वरिष्ठांकडे, माध्यमांपर्यंत पोहोचवत नाही. दुसऱ्या एका सर्वेक्षणात ४८६ महिला केनियन खेळाडूंची माहिती विचारण्यात आली. त्यापैकी ११ टक्के खेळाडूंनी सांगितलं की, त्यांनी आजवर अनेकदा लैंगिक, शारीरिक आणि मानसिक अत्याचाराला तोंड दिलं होतं. ५७% टक्के खेळाडूंनी सांगितलं, त्यांनी १० हून जास्त वेळा अशा प्रकारचा अनुभव घेतला होता.

मेरी म्हणते, “तुम्ही जेव्हा एखादी लहान किंवा तरुण मुलगी म्हणून एखाद्या क्रीडा शिबिराला जाता तेव्हा तुम्ही कधीही पूर्णपणे निश्चिंत राहू शकत नाही. तुमचा प्रशिक्षक किंवा बरोबरचे पुरुष खेळाडू तुमच्याशी कसे वागतील याची भीती आणि दडपण बहुतेक वेळा मनावर असतंच. तुम्हाला काहीही करून गावी परत जायचं नसतं. तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असतं, पण त्याची फार मोठी किंमत काही वेळा चुकवायला लागू शकते.”अर्थात ही फार टोकाची शक्यता झाली. एखाद्या खेळात जेव्हा सगळे प्रशिक्षक पुरुष असतात तेव्हा त्यातून एक व्यापक प्रकारची असमानता निर्माण होते. कुठल्याही प्रकारची असमानता ही पुढे होणाऱ्या अत्याचारांची पायाभरणी करत असते. म्हणूनच मेरी न्गुगीने महिला धावपटू आणि प्रशिक्षक तयार करणारा क्लब सुरू केला आहे.

मी योग्य ‘ट्रॅक’वर आहे..मेरी म्हणते, “संख्याबळ ही फार मोठी गोष्ट असते. आम्ही जास्तीत जास्त महिला प्रशिक्षक तयार करण्याचा प्रयत्न करतो आहोत. कारण महिला प्रशिक्षकांची संख्या वाढेल तेव्हाच या क्षेत्रात स्त्री-पुरुष समानता येऊ शकेल!” आज मेरीच्या नाला ट्रॅक क्लबमध्ये अनेक लहान मुली प्रशिक्षण घेत आहेत. या मुलींकडे बघून मेरीचा हुरूप खूप वाढतो. तिच्या मनात कायम विचार येतो, मी त्यांच्या वयाची होते तेव्हा जर मला मदत मिळाली नसती तर मी आज जिथे आहे तिथे कधीच पोहोचू शकले नसते. आज मी तीच मदत या मुलींना करते आहे. त्या किती खूश आहेत हे बघून पावती मिळते की मी योग्य ‘ट्रॅक’वर आहे. महिला स्टार घडवण्यासाठी अक्षरश: वाट्टेल ते करण्याची तिची तयारी आहे.