शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

'या' सापाची किंमत ३ कोटी रूपये, पण ब्लॅक मार्केटमध्ये इतकी डिमांड असण्याचं काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 2:01 PM

या सापाची मार्केटमधील किंमत ३ कोटी रूपयांपेक्षा अधिक सांगतिले जाते. त्यामुळे अर्थातच या सापाला एवढी किंमत का असा प्रश्न लोकांना पडतो. 

नुकतंच एका व्यक्तीला एका दुर्मिळ प्रजातीच्या सापाची विक्री करताना अटक करण्यात आली. याआधीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. या व्यक्तीचं नाव जय प्रकाश शर्मा असं त्याच्याकडून एक दुतोंडा म्हणजेच मांडूळ साप ताब्यात घेतला. मंद हालचाल,जाडसर शरीर, शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने याला दुतोंड्या असे नाव आहे.

पोलिसांना आधीच या सापाची विक्री केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. या सापाची मार्केटमधील किंमत ३ कोटी रूपयांपेक्षा अधिक सांगतिले जाते. त्यामुळे अर्थातच या सापाला एवढी किंमत का असा प्रश्न लोकांना पडतो. 

मांडूळ या सापाचा वापर सेक्स पॉवर वाढवण्यासाठी, नशेचे पदार्थ तयार करण्यासाठी, महागडे परफ्यूम तयार करण्यासाठी आणि कॅन्सरच्या उपचारासाठी विदेशात केला जातो. चला जाणून घेऊ या सापाविषयी आणखी काही खास गोष्टी....

कुठे राहतो हा साप?

हा साप जास्त करून वाळूमध्ये राहतो. अ‍ॅनाकोंडाप्रमाणे या सापाचे डोळे डोक्यावर असतात. शिकारीसाठी हा साप वाळूमध्ये स्वत:ला लपवतो आणि केवळ त्याचं डोकं वर राहतं. शिकार जवळ येताच त्यावर हल्ला करतो. परदेशात अनेकजण हा साप पाळतात सुद्धा. सापांच्या सर्व प्रजातींमधील जमिनीवरील सर्पांतील लाजाळू व शांत स्वभावाचा हा साप आहे.

प्रजननाचं माध्यम

(Image Credit : tripadvisor.in)

मांडूळ सापांमध्ये प्रजनन मादा द्वारे अंडी देऊन होतं. जन्मावेळी सापाची लांबी आठ ते दहा इंच इतकी असते. त्यांचा प्रजननाचा काळ हा पानझळ किंवा थंडीच्या दिवसात असतो. 

कुठे आढळतात हे साप?

या सापाच्या वेगवेगळ्या प्रजाती वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आढळून येतात. एक प्रजाती उत्तर अमेरिकेतील मुख्य रूपाने प्रशांत महासागराच्या तटावर आढळून येते. एक प्रजाती यूरोप, उत्तर आफ्रिका आणि आशियाच्या काही भागांमध्ये आढळते. तर भारतात आणि आफ्रिकेतही एक प्रजाती आढळते.

काय खातात आणि कशी करतात शिकार?

इतर सापांप्रमाणेच हा साप देखील मांसाहारीच आहे. या सापांच्या राहण्याच्या ठिकाणाच्या आधारावर शिकार वेगवेगळे असतात. तसे हे साप जास्त करून उंदीर, पाल, बेडूक, ससे इत्यादी शिकार करतात. वाळूच्या खाली लपून हा साप शिकारीची वाट बघतो. शिकार जवळ आल्यावर आपल्या धारदार दातांनी त्यावर हल्ला करतो. तसेच शिकार बेशुद्ध होईपर्यंत त्यांचं रक्त पित राहतो.

कशासाठी वापरतात?

असे म्हणतात की, या सापाचा वापर कॅन्सरच्या उपचारासाठी आणि लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी केला जातो. याने इरेक्टाइल डिस्फंक्शन ही समस्या दूर होत असल्याचं बोललं जातं. त्यासोबतच सांधेदुखीवरही याचा वापर केला जातो. तर मलेशियात या सापाबाबत एक अंधविश्वास प्रचलित आहे. लोक इथे मानतात की, लाल मांडूळ साप व्यक्तीचं नशीब चमकवू शकतो. तसेच या सापाची कातड्याचा वापर कॉस्मेटिक्स, पर्स, जॅकेटसाठीही केला जातो.

टॅग्स :snakeसापInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके