नवी दिल्ली - भारताचे रेल्वे नेटवर्क सुमारे ६५ हजार किलोमीटर लांब आहे. देशात एकूण रेल्वे स्थानकांची संख्या ७,३४९ आहे. आपल्या देशात दररोज करोडो लोक रेल्वेने प्रवास करतात. तुम्हीही आतापर्यंत अनेकदा ट्रेनने प्रवास केला असेल. प्रवासादरम्यान तुम्ही अनेक रेल्वे स्थानकांवरून गेला असेल. त्यादरम्यान तुम्ही रेल्वे स्थानकांची नावे पाहिली असतील तर त्यातील अनेकांच्या नावांमागे काही खास शब्द जोडलेले असतात आणि ते शब्द तुम्ही ठराविक स्थानकांवरच पाहिले असतील.
आपण ज्या स्टेशनच्या मागे "जंक्शन, टर्मिनल/टर्मिनस आणि सेंट्रल" लिहिलेल्या या तीन शब्दांबद्दल बोलत आहोत. तुम्हाला माहित आहे का की, कोणत्या स्टेशनवर जंक्शन शब्द वापरतात, कोणत्या स्टेशन्सला टर्मिनल आहे आणि कोणते सेंट्रल म्हणून संबोधलं जातं? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला हे ३ शब्द कोणत्या स्टेशनवर वापरले जातात त्याबद्दल सांगणार आहोत.
टर्मिनल आणि टर्मिनस(Terminal/Terminus) या शब्दांमध्ये फरक नाही. दोन्हीचा अर्थ एकच आहे. रेल्वे टर्मिनल म्हणजे "अखेरचं स्थानक" जिथून गाड्या पुढे जात नाहीत. सोप्या भाषेत सांगायचे तर ते ट्रेनच्या मार्गावरील शेवटचे स्टेशन आहे. येथून ट्रेन एकतर परतात किंवा प्रवास संपवतात. टर्मिनल हा शब्द टर्मिनेशनपासून बनला आहे. ज्याचा अर्थ संपणे असा आहे. देशातील काही प्रमुख रेल्वे टर्मिनसबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांचा समावेश होतो.
काही रेल्वे स्थानकांवर जंक्शन उल्लेख आढळतो असं का?आता जंक्शनबद्दल सांगायचं झालं तर अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर जंक्शन लिहिलेले तुम्ही पाहिले असेलच. जर तुम्हाला कोणत्याही स्थानकावर कुठेही जंक्शन लिहिलेले दिसले, तर समजायचं की येथून दोनपेक्षा जास्त रेल्वे मार्ग निघत आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर, एका जंक्शनमध्ये ट्रेनसाठी किमान तीन मार्ग असतात, ट्रेन येते आणि तिला कोणत्या मार्गाने जायचे याचे दोन पर्याय उपलब्ध असतात. अशा परिस्थितीत ट्रेन त्यानुसार आपला मार्ग निवडू शकते. त्यात कल्याण जंक्शनचा समावेश होतो. तिथून तुम्हाला कर्जत आणि कसारा या दोन मार्गावर जाणाऱ्या ट्रेन दिसतील. रेल्वे सेंट्रल म्हणजे काय?त्याच वेळी, जर तुम्हाला कोणत्याही रेल्वे स्थानकावर सेंट्रल लिहिलेले दिसले तर समजायचं की हे शहरातील मुख्य आणि सर्वात जुने रेल्वे स्थानक आहे. येथे एकाच वेळी अनेक गाड्या येतात आणि जातात. सेट्रंल स्थानक त्याच शहरांमध्ये बांधले गेले आहे, जिथे इतर रेल्वे स्थानके देखील आहेत. मध्य रेल्वे स्थानकांच्या मदतीने मोठी शहरे एकमेकांशी जोडली गेली आहेत. देशातील काही प्रमुख मध्य रेल्वे स्थानकांबद्दल सांगायचे तर, त्यात मुंबई सेंट्रल, कानपूर सेंट्रल आणि चेन्नई सेंट्रल या स्थानकांचा समावेश आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"