Interesting Facts : शर्ट घालण्याची आवड प्रत्येकालाच असते. बालपणी शाळेच्या यूनिफॉर्मपासून ते ऑफिसच्या फॉर्मल ड्रेसपर्यंत, शर्ट तरूणी आणि तरूणांच्या वार्डरोबचा महत्वाचा भाग असतं. पण तुम्ही कधी नोटीस केलंय का की, तरूण आणि तरूणींच्या शर्टचे बटन वेगवेगळ्या साइडला असतात. महिलांच्या शर्टचे बटन डाव्या बाजूला आणि पुरूषांच्या शर्टचे बटन उजव्या साइडला असतात. चला जाणून घेऊन यामागचं कारण.....
महिला आणि पुरूषांच्या शर्टचे बटन वेगवेगळ्या साइडला असण्यामागे वेगवेगळे तर्क दिले जातात. असे म्हटले जाते की, पुरूषांना बटन उघडणे किंवा बंद करण्यासाठी डाव्या हाताचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे त्यांच्या शर्टमध्ये उजव्या बाजूला बटन असतात. तेच महिलांच्या शर्टमध्ये डाब्या बाजूला बटन असतात. अनेक इतिहासकारांनी असा तर्क दिला की, पुरूषांसाठी उजव्या हाताने आपल्या शस्त्रापर्यंत पोहोचणं सोपं होत होतं. ज्यामुळे उजव्या बाजूला बटन लावले जातात. जेणेकरून हाताने शर्ट आणि जॅकेटमधील हत्यार सहजपणे काढता यावे.
महिला आपल्या बाळांना कडेवर घेण्यासाठी डाव्या हाताचा वापर करतात. त्यामुळे महिल्यांच्या शर्टचे बटन डाव्या बाजूने दिले जातात. जेणेकरून त्या उजव्या हाताने बटन उघडून बाळांना स्तनपान करू शकतील. एक तर्क असाही दिला जातो की, जुन्या काळात महिला घोडेस्वारी करत होत्या आणि त्यावेळी त्या डावीकडे बटन असलेले शर्ट वापरत होत्या. जेणेकरून हवेमुळे त्यांच्या शर्टची बटने उघडू नये. नंतर हीच कॉन्सेप्ट कायम ठेवली गेली आणि मेकर्सनी अशाप्रकारेच शर्ट बनवने सुरू केले.
महिला आणि पुरूषांच्या शर्टचे बटन वेगवेगळ्या साइडला असण्याचा किस्सा नेपोलियन बोनापार्टशी संबंधित आहे. नेपोलियन बोनापार्टन त्याचा उजवा हात आपल्या शर्टच्या आत ठेवणं पसतं होतं. त्यानंतर अनेकांनीही त्यांचीही ही स्टाइल फॉलो करणं सुरू केलं. असे म्हणतात की, हे नेपोलियन बोनापार्ट यांना अजिबात आवलं नाही. ज्यानंतर त्यांनी आदेश काढला की, आतापासून महिलांच्यांचे बटन डाव्या बाजूने असतील.