Why Tyres Color Black : आजकाल लोकांकडे दुचाकी किंवा चारचाकी वाहन असणं फारच कॉमन झालं आहे. बाजारात वेगवेगळ्या रंगांच्या आणि कंपन्यांच्या गाड्या मिळतात. आपल्या आवडीच्या रंगाची गाडी घेण्याचा लोकांचा फार आग्रह असतो. मात्र, तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केलाय का की, दुचाकी असो वा चारचाकी गाड्यांच्या टायरचा रंग एकच म्हणजे काळाच का असतो? कदाचित तुम्हाला हा प्रश्न पडला असेलच. पण याचं उत्तर माहीत नसेल. तेच आज जाणून घेणार आहोत.
काळ्या रंगाचेच टायर असण्याचं कारण...
तुम्हाला माहीत नसेल पण टायरचा रंग काळा असण्यामागे फार मोठं सायन्स आहे. त्यामुळेच सगळ्याच कंपन्या काळ्या टायरला चांगला मानतात. एका रिपोर्टनुसार, कच्चा रबर म्हणजे रॉ रबर पिवळ्या रंगाचा असतो. पण या रबराने टायर बनवला तर तो लवकर घासला जातो. त्यामुळे टायरसाठी वापरण्यात येणाऱ्या रबरमध्ये कार्बन मिक्स केलं जातं. जेणेकरून ते जास्त काळ टिकावं. हेच मजबूतीसाठी मिक्स केलं जाणारं कार्बनच टायरला काळं करतं. कार्बनसोबतच यात सल्फरही मिक्स केलं जातं. ज्यामुळे टायर मजबूत होतात.
वेगळ्या रंगाचे टायर नसण्याचं कारण...
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, कधीकाळी गाड्यांच्या टायरचा रंग पांढरा राहत होता. आजच्या काळ्या रंगाच्या टायरच्या तुलनेत पांढरे किंवा दुधिया रंगाचे टायर कमी मजबूत असायचे. तुम्ही लहान मुलांच्या सायकले टायर पाहिले असतील. ते वेगवेगळ्या रंगाचे असतात. हे टायर काही महिन्यात घासून खराब होतात. कारण यात कार्बनचा वापर केलेला नसतो.