Why Chips Packets Are Filled With Air: तुम्ही दुकानात जेव्हाही कुरकुरे किंवा चिप्सचं पॅकेट खरेदी करता तेव्हा त्यात किती हवा असते हे तुम्हाला माहीत असेलच. अनेकजण विचार करत असतील की, कंपनीवाले ग्राहकांसोबत फसवणूक करतात. इतकं मोठं पॅकेट दाखवून पैसे तर पूर्ण घेतात पण त्यात चिप्स किंवा कुरकुरे कमीच असतात. पण हे पूर्णपणे सत्य नाहीये. पॅकेटमध्ये हवा भरणं कंपनीसाठी फायदा आणि मजबुरी दोन्ही आहे.
पॅकेटमध्ये भरला असतो नायट्रोजन गॅस
मुळात कुरकुरे-चिप्सच्या पॅकेटमध्ये नाइट्रोजन गॅस भरलेला असतो. यात हा गॅस असल्यामुळे चिप्स जास्त वेळ कुरकुरीत राहतात. बाहेरच्या हवेच्या संपर्कात आले की, ते नरम होतात. हेच कारण आहे की, जेव्हाही पॅकेट फोडून त्यातून चिप्स बाहेर काढता ते कुरकुरीत आणि फ्रेश असतात. त्यांची टेस्टही आधीसारखीच राहते.
कोणत्या कारणाने भरली जाते हवा
फूड एक्सपर्ट्सनुसार, ग्राहकांना फ्रेश आणि कुरकुरीत पदार्थ खाणं पसंत करतात. जर पॅकेटमध्ये नाइट्रोजन गॅस भरला गेला नाही तर पॅकेटमधील चिप्स किंवा कुरकुऱ्यांचा चुरा होईल. जे कुणालाही खाणं आवडणार नाही. त्यामुळेच नुकसानापासून वाचण्यासाठीही कंपन्यांना असं करावं लागतं.
पॅकेटमध्ये गॅस भरणं कंपन्यांसाठी फायदेशीर देखील आहे. त्यांना ग्राहकांची ही मानसिकता माहीत आहे की, ग्राहकांना सामान्यपणे खाण्या-पिण्याचे मोठे पॅकेट खरेदी करणं पसंत करतात. अशात कंपन्या जेव्हा पॅकेटमध्ये हवा भरून विकतात तेव्हा त्यात जास्त चिप्स असण्याच्या आशेपोटी लोक ते खरेदी करतात. जर कंपन्यांनी पॅकेटमध्ये हवा भरली नाही तर त्यांच्या विक्रीत घट होऊ शकते.