Knowledge News: आयुष्य सगळ्यांनाच कधीना कधी डॉक्टरांकडे जावं लागतं. डॉक्टर सर्वांनाच एका चिठ्ठीवर औषधं लिहून देतात. पण ते वाचता मात्र फक्त मेडिकलवाल्यालाच येतं. डॉक्टरांच्या याच चिठ्ठीवर वेगवेगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात. पण त्यांना अर्थ नक्कीच असतो. अशाच एका शॉर्ट फॉर्मबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. डॉक्टर औषधाच्या चिठ्ठीवर सर्वातआधी लिहितात Rx. तुम्हाला याचा अर्थ माहीत आहे का? नसेल माहीत तर चला जाणून घेऊ...
काय होतो Rx चा अर्थ?
प्रिस्क्रिप्शनच्या चिठ्ठीवर डाव्या बाजूला लिहिलेल्या Rx चा अर्थ होतो 'Recipe'. हा एक लॅटिन भाषेतील शब्द आहे. ज्याचा अर्थ होतो 'To take'. याचा अर्थ की, डॉक्टरांनी चिठ्ठीवर जे काही लिहून दिलं आहे ते रूग्णाला घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टर जेव्हा चिठ्ठीवर Rx लिहितात तेव्हा ते सावधगिरी बाळगण्यासही सांगतात. डॉक्टर त्यावर काही गोष्टी अशा लिहितात ज्या रूग्णांनी व्यवस्थित फॉलो करायच्या असतात.
इतरही काही शॉर्ट फॉर्म
तुम्ही पाहिलं असेल की, या चिठ्ठीवर Rx सोबतच इतरही काही कोड वर्ड्सचा वापर केलेला असतो. जसे की, एखाद्या औषधासोबत Amp लिहिलं असेल तर याचा अर्थ होतो की, हे औषध रात्री जेवणाआधी घ्यायचं आहे. तेच जर AQ लिहिलं असेल तर त्याचा अर्थ आहे की, हे पाण्यासोबत घ्यायचं आहे. एखाद्या औषधासोबत BID लिहिलं असेल तर याचा अर्थ होतो की, हे औषध दिवसातून दोनदा घ्यायचं आहे.
अनेकदा तर औषधांचं नाव लिहिण्यासाठीही शॉर्ट फॉर्मचा वापर केला जातो. जसे की, बर्थ कंट्रोल पिल्ससाठी BCP आणि एस्प्रिनसाठी ASA चा वापर केला जातो. तसेच ईयर ड्रॉपसाठी AU या शॉर्ट फॉर्मचा वापर केला जातो. ज्याचा अर्थ ड्रॉप दोन्ही कानात टाकायचा आहे.
त्याचबरोबर काही टेस्टसाठीही अशाप्रकारच्या शॉर्ट फॉर्म्सचा वापर केला जातो. जसे की, चेस्ट एक्स-रे साठी CXR आणि हृदयासंबंधी आजारासाठी CV. तेच कम्प्लिट ब्लड काउंटसाठी CBC चा वापर केला जातो.