Jarahatke : जीन्सची पॅन्ट खरेदी करताना आपण त्याचा रंग, डिझाईन, कपडा कसा आहे, स्ट्रेट फिट किंवा पेन्सील बॉटम कशी असावी याचा विचार करत असतो. पण जीन्स विकत घेताना अनेकजण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. त्याचा जराही विचार करत नाहीत. ती म्हणजे जीन्सच्या पॉकेटवर असलेली छोटी बटने.
तुम्ही कधी जीन्स पॅंन्टच्या पॉकेटवर असलेल्या धातूच्या छोट्या छोट्या बटनांवर लक्ष देत नसाल. कदाचित कुणी हाही विचार केला असेल की, पॉकेटवर लावण्यात आलेली ही धातूची बटने डिझाईन किंवा स्टाईल म्हणून लावण्यात आली असेल. पण तसं नाहीये. चला जाणून घेऊया याचं कारण...
पूर्वी पाश्चिमात्य देशांमधील कंपनीतील कामगार जीन्स घालायचे, त्यांना कठिण परिश्रम करावे लागत होते. त्यामुळे जीन्सच्या पॉकेट फाटने एक सामान्य बाब होती. तेव्हा ही एक समस्या बनली होती. कारण पॉकेट कामगारांसाठी अनेकदॄष्टीने महत्वाचे होते.
पुढे या समस्येवर मात करण्यासाठी एका टेलरने आयडियाची कल्पना लावली. जॅकब डेविस याला ही आयडियाची कल्पना सुचली आणि त्याने या समस्येवर उपाय शोधून काढला. त्याने १८७३ मध्ये जीन्सच्या डिझाईनमध्ये असा बदल केला जो आजही बघायला मिळतो. आजही तिच डिझाईन चालत आहे. जॅकब हे त्याकाळात Levi Strauss & Co., जी आज Levi’s च्या नावाने प्रसिद्ध आहे त्या कंपनीचे एक ग्राहक होते.
जॅकबने जीन्सच्या पॉकेटच्या बॉर्डरवर धातूचे बटन लावले. यामुळे जीन्सचे पॉकेट ताणले जात होते आणि यामुळेच पॉकेट फाटण्यापासून वाचत होते. जॅकबला त्याची ही आयडिया पेटंट करायची होती. पण त्याच्या पैसे नसल्याने तसे करता आले नाही.
नंतर १८७२ मध्ये त्याने Levi Strauss ला पत्र लिहून त्याची ही आयडिया विकत घेण्याचा प्रस्ताव दिला. पण त्यात एक अट त्याने ठेवली आणि ती अट म्हणजे या आयडियाच्या बदल्यात Levi Strauss याने जॅकबला पेटेंट करण्यासाठी पैसे द्यावे आणि झालेही तसेच. तेव्हापासून आपल्या जीन्सवर ही बटने अशाप्रकारे बघायला मिळत आहेत. ही बटने सहजासहजी कुणी काढूही शकत नाही.