आवडत्या व्यक्तीसोबत लग्नाचा दिवस असो वा एखादी खूप जास्त आवडती वस्तू मिळण्याचा दिवस असो. अनेकांनी आनंदाचे अश्रू अनुभवले असतील. तुम्ही दु:खात अश्रू येत असल्याच्या अनेक घटना पाहिल्या असतील. एकवेळ हे दु:खात डोळ्यात अश्रू येणं समजूही शकतं. पण आनंदाच्या क्षणी डोळ्यात अश्रू कसे येतात? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. अनेकांना तर हा विचित्रपणा वाटत असेलही, पण विज्ञान सांगतं की, असं होणं नॉर्मल आहे.
(Image Credit : independent.co.uk)
Fatherly या वेबसाइटसोबत बोलताना मानसोपचार तज्ज्ञ Oriana R Aragon यांनी सांगितले की, मनात सकारात्मक भावना आल्यानंतरही काही लोकांच्या चेहऱ्यावर नकारात्मक हावभाव बघायला मिळतात. Oriana R Aragon यांनी २०१५ मध्ये Happy Tears वर केलेल्या रिसर्चमधून ही गोष्टी समोर आली आहे.
तर एका दुसऱ्या रिसर्टमधून असं आढळून आलं की, आनंदाच्या अश्रूंसाठी चांगली बिर्याणी किंवा आवडत्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळणंच अनिवार्य नाही. त्यासाठी व्यक्तीमध्ये भावना असणं गरजेचं आहे.
(Image Credit : fatherly.com)
Psychology Today च्या एका रिपोर्टनुसार, मेंदूतील Hypothalamus आनंद किंवा दु:खं, टेन्शन किंवा ओव्हरएक्साइटमेंटमध्ये फरक करू शकत नाही. Hypothalamus जवळ Amygdala तून Neural Signal जातो आणि त्याला केवळ हेच माहीत असतं की, त्याला Autonomic Nervous System (Involuntary Nervous System) अॅक्टिवेट करायची आहे.
Autonomic Nervous System चे दोन भाग
Sympathetic -
Sympathetic Nervous System आपल्या शरीराला स्ट्रेस दरम्यान मोबिलाइज म्हणजे एकत्र करतो. त्यामुळे आपल्या हृदयाचे ठोके वाढतात. आपल्याला घाम येऊ लागतो आणि काही लोकांना तर जोरदार भूकही लागते.
(Image Credit : fatherly.com)
Parasympathetic
Parasympathetic Nervous System आपल्याला शांत करते. त्यासोबतच या सिस्टीममध्ये काही विचित्र घटनाही घडतात. ही सिस्टीम Tear Duct सोबत कनेक्ट असते. Neurotransmitter Acetycholine ने Parasympathetic Nervous System, अॅक्टिवेशन केल्यावर डोळ्यातून अश्रू येतात. नाक वाहू लागतं.
Miceli आणि Castelfranchi ची एक थेअरी सांगते की, इमोशनल अश्रू हे लाचारी किंवा काहीच करू न शकण्याच्या स्थितीतही येतात. मग तो तणाव असो वा आनंदाची बातमी असो. हा एक कंट्रोल न ठेवता येणाऱ्या स्थितीसारखा रिफ्लेक्स रिस्पॉन्स आहे.