शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
2
"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
3
कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?
4
जयराम रमेश यांनी डेटा अपडेटमध्ये उशीर केल्याचा आरोप केला; निवडणूक आयोगाने प्रत्येक मिनिटांचे उत्तर दिले
5
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: विजयाचे श्रेय पंतप्रधान मोदींना- हरयाणाचे मुख्यमंत्री सैनी यांची प्रतिक्रिया
6
Uddhav Thackeray : "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे
7
ढोल वाजवले, फटाके फोडले; लाडू, जिलेबी वाटली, पण… काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांवर नामुष्की 
8
"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले?
9
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री; विजयानंतर फारुख अब्दुल्लांची घोषणा
10
'त्या' लोकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक द्या; तुषार गांधींची उद्धव ठाकरेंकडे मागणी
11
हरयाणात 'मोदी मॅजिक', राहुल गांधींनी जिथे सभा घेतल्या, त्या उमेदवारांचे काय झाले? पाहा...
12
Bharti Airtel करणार Tata Group सोबत मोठी डील, टाटांची 'ही' कंपनी खरेदी करण्याची तयारी
13
Haryana Election Result : "हरयाणात नक्कीच काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करेल...", विनेश फोगाटचा दावा
14
गाडीसाठी 20, घरासाठी 60 लाख... हरयाणाच्या आमदारांना किती वेतन मिळते? 
15
हरयाणात काँग्रेसला अजुनही होप्स...? 'या' जागा ठरवणार कोणाचे सरकार, मताधिक्य केव्हाही....
16
Eknath Shinde News : मंत्रिमंडळ बैठकीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, कारण...
17
YouTuber ने ठोकली १.७ कोटींची सुपरकार, गाडी चालवताना करत होता Live स्ट्रीम (Video)
18
"आधी बायकोसाठी बाथरुम बांधणार", 'बिग बॉस मराठी' विजेता सूरज चव्हाणचं वक्तव्य, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
19
मोदी बागेत रणनीती! सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये चेहरा लपवणारा 'ती' व्यक्ती कोण?
20
Bigg Boss 18 : "तुम्ही माझ्या हृदयात स्थान बनवलं आहे", 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचं चाललंय तरी काय?

गालावर खळी कशी पडते, काय असतं यामागचं कारण? जाणून घ्या यामागचं रहस्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 12:47 PM

Dimples reason : ही खळी पडते कशी याचा कधी कुणी विचार केलाय का? का काही लोकांच्या गालावर खळी असते आणि काहींच्या नाही? चला जाणून घेऊ याचं उत्तर....

Dimples reason : गालावर पडणारी खळी ही अनेकांच्या आकर्षणाचं केंद्र असते. या खळीमुळे चेहऱ्याच्या सौंदर्यात दुप्पट भर पडते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. शाहरूख खान, दीपिका पादुकोन, आलिया भट्ट, प्रीति झिंटा, गुल पनाग असे कितीतरी स्टार्स आहेत ज्यांच्या खळी असलेल्या स्माइलने अनेकांना घायाळ केलं आहे. दुसऱ्यांची ही गालावर पडणारी खळी पाहून आपल्यालाही अशी खळी का नाही, अशी अनेकदा खंतही व्यक्त केली जाते. पण ही खळी पडते कशी याचा कधी कुणी विचार केलाय का? का काही लोकांच्या गालावर खळी असते आणि काहींच्या नाही? चला जाणून घेऊ याचं उत्तर....

हे आहे खळी पडण्याचं कारण...

काही अभ्यासकांनुसार, गालावर खळी पडण्याचं कारण हे जेनेटिक म्हणजेच आनुवांशिक आहे. म्हणजे आधीच्या पिढीकडून नंतरच्या पिढीला ही खळी आपोआप मिळते. पण याचा अर्थ हा नाही की, तुमच्या आई-वडिलांच्या गालावर खळी पडते तर तुमच्याही गालावर खळी पडेल. ही एक अनियमित विशेषता आहे. काही अभ्यासकांनी असेही आहेत जे म्हणतात की, खळी पडणे आनुवांशिकता गुण आहे हे सिद्ध करणारे पुरेसे पुरावे नाहीयेत. 

छोटी मांसपेशी

एका दुसऱ्या थेअरीनुसार, काही लोकांमध्ये खळी पडते कारण त्यांच्या गालावर एक विशेष मसल असते जी इतरांच्या तुलनेत जास्त लहान असते. त्यामुळे गालावर खळी येते. गालामधील या मसलला जायगोमॅटिकस म्हटले जाते. ही मसल मधून विभागली गेली किंवा लहान राहिली तर गालावर खळी पडते. 

लहानपणी असलेली खळी मोठ्यापणी गायब

अनेकांमध्ये असंही बघायला मिळतं की, काही लोकांच्या गालावर बालपणी खळी बघायला मिळते. पण ते जसजसे मोठे होत जातात त्यांची ही गालावरची खळी नाहिशी होत जाते. याचं कारण आहे बालपणी लहान मुलांच्या गालांमधील बेबी फॅट. पण लहान मुलं मोठी होत असताना तेव्हा हे बेबी फॅट नष्ट होऊ लागतात. त्यामुळे खळीही नाहिशी होते. 

हनुवटीवरही असते खळी

अभिनेते विनोद खन्ना यांच्या हनुवटीवर खळी होती. अनेकांना असं वाटतं की, केवळ गालावरच खळी येते. हनुवटीवरही खळी येते. याचं कारण ना आनुवांशिक आहे ना मांसपेशी लहान असणं. हनुवटीवर खळी येते कारण जेव्हा बाळ आईच्या गर्भात वाढत असतं तेव्हा बाळाची उजव्या आणि डाव्या बाजूचं हनुवटीचं हाड जुळत नाही, त्यामुळे ही खळी इथे तयार होते. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके