रेल्वेचा प्रवास करणं लोकांना खूप आवडतं. कारण लांबचा प्रवासही रेल्वे सुखकर आणि आरामदायक होतो. तुम्हीही कधीना कधी रेल्वेने प्रवास केला असेलच. तुम्ही कोणत्याही स्टेशनवर गेलात तर एक गोष्टी नक्की पाहिली असेल की, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर स्टेशनचं नाव पिवळ्या रंगाच्या बोर्डवर काळ्या अक्षरात लिहिलेलं असतं. पण हे असं का याचा कधी तुम्ही विचार केला का?
मुळात पिवळा रंग दुरूनही स्पष्ट दिसतो. अशात पिवळ्या बोर्डवर स्टेशनचं नाव लिहिण्याचं कारण हेच आहे की, बोर्ड लोको पायलटला दुरूनच दिसतो आणि तो त्यानुसार रेल्वेचा स्पीड कमी करतो. याने लोको पायलटला हे समजतं की, त्यांनी कधी आणि कुठे थांबायचं आहे.
त्यासोबतच पिवळा रंग एक असं रंग आहे जो दिवसा आणि रात्रीही स्पष्ट दिसतो. त्यामुळे रेल्वे स्टेशनचं नाव लिहिण्यासाठी पिवळ्या रंगाच्या बोर्डचा वापर केला जातो. पिवळ्या रंगाच्या बोर्डवर बोर्डवर काळ्या अक्षरातील नाव दूरूनच स्पष्ट दिसतं. त्याशिवाय पिवळा रंग पावसात, धुक्यातही ओळखता येतो.
लाल रंगानंतर पिवळ्या रंगाचीच वेवलेंथ अधिक जास्त असते. याच कारणाने स्कूल बसेसचा रंगही पिवळा असतो. पिवळ्या रंगाचा लॅटरल पेरीफेरल व्हिजन लाल रंगाच्या तुलनेत 1.24 पटीने जास्त असतो. याचा अर्थ असा होतो की, कोणत्याही रंगाच्या तुलनेत हा रंग दुरून सहजपणे दिसून येतो.