Ethiopia News : इथिओपियामधील आदिवासी समाज मुर्सी आधुनिक गोष्टींपासून फार दूर आहेत. पण आपल्या वेगळेपणामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. यातीलच एक म्हणजे येथील महिलांकडून ओठांमध्ये घातली जाणारी एक विशेष डिस्क. ही डिस्क इतकी प्रसिद्ध आहे की, पर्यटक ती बघण्यासाठी इथे येतात.
महिला इथे ओठांमध्ये एक मोठी डिस्क लावतात ज्याला लिप प्लेट म्हटलं जातं. मूर्सी समाजाशिवाय इतरही काही समाजाता लिप प्लेटचं चलन आहे. ही प्रथा हजारो वर्षापासून असल्याचं सांगण्यात येतं.
लग्नाच्या काही महिन्यांआधी घालतात लिप डिस्क
लग्नाच्या साधारण 6 ते 12 महिन्यांआधी एका तरूणीच्या ओठांवर आई किंवा नातेवाईकांकडून असे लिप डिस्क लावले जातात. सामान्यपणे असं 15 ते 18 वयोगटातील मुलींसोबत केलं जातं.
ही डिस्क लावल्यानंतर सामान्यपणे दोन ते तीन आठवडे ती भरण्यासाठी वेळ लागतो. आधी लहान डिस्क मग मोठी डिस्क लावली जाते. आधी मातीपासून बनलेली 4 सेमीची डिस्क लावली जाते. प्रत्येक महिला आपली डिस्क स्वत: बनवते. त्यांना याचा अभिमान असतो.
2007 मध्ये झालेल्या राष्ट्रीय जनगणनुसार, या लोकांची संख्या 11,500 आहे. ज्यातील 848 शहरी भागात राहतात. एकूण लोकांपैकी 92.25% दक्षिणी राष्ट्र आणि इतर ठिकाणी राहतात.