वाघ अनेकदा पाण्यात बसलेले दिसतात. परंतु त्यामागील कारण काय आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी याचबाबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यांनी त्यामागील वैज्ञानिक कारण स्पष्ट केले.
अनेकदा वाघाशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर येत राहतात, ज्यामध्ये तो कधी जंगलात फिरताना तर कधी शिकार करताना दिसतात. तर काही व्हिडिओमध्ये वाघ बराच वेळ पाण्यात बसलेले दिसतात. बरेचदा लोक जंगल सफारीवर जातात ते प्राणी पाहण्यासाठी आणि त्यांना जवळून पाहण्यासाठी. अशा परिस्थितीत कधी-कधी वाघांचा कळप पाण्यात बसलेला दिसतो, पण त्यामागे काय कारण आहे याचा कधी विचार केला आहे का?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा (IFS सुशांत नंदा) यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून वाघाने असे करण्यामागील वैज्ञानिक कारण स्पष्ट करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पाच वाघ पाण्यात आनंदाने बसून आराम करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये शिकारीला जाण्याचा बेत आखत असल्याचे दिसत आहे.
व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'वाघ आणि पाणी एकमेकांसाठी बनलेले आहेत. वाघ सामान्यत: उष्ण हवामानात राहतात आणि विशेष संरचनेमुळे त्यांना लवकर गरम वाटू लागते. त्यांच्या शरीराच्या बहुतेक भागांमध्ये घाम ग्रंथी नसतात, म्हणून जेव्हा त्यांचे शरीर खूप गरम होते. त्यामुळे वाघ अनेक तास पाण्यात बसून राहणे पसंत करतात.
दरम्यान, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, वाघ शरीराचे तापमान राखण्यासाठी पाणवठ्यांमध्ये तासनतास बसतात. यासोबतच आणखी एक खास गोष्ट म्हणजे, वाघ हे उत्तम जलतरणपटू मानले जातात. ते एका वेळी ३० किलोमीटरपर्यंत पोहू शकतात.
अवघ्या २८ सेकंदांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, आतापर्यंत ३६ हजार वेळा पाहिला गेला आहे. तर १ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'निसर्ग नेहमीच सोबत घ्यायला शिकवतो आणि एकमेकांचे महत्त्व सांगतो.' दुसर्या युजरने लिहिले की,'वाघ अनेकदा रणथंबोर आणि मध्य प्रदेशच्या नॅशनल पार्कमध्ये असे करताना दिसतील'.