सध्या हिवाळा जरी सुरु असला तरीही तरुणाईमध्ये कोल्डड्रिंकची क्रेझ आहे. अनेकजण पाण्याऐवजी जास्त कोल्डड्रिंकच पितात. पण तुम्ही कधी कोल्डड्रिंक किंवा सोड्याच्या बाटलीकडं (Bottle) लक्षपूर्वक पाहिलं असता तिचा आकार वैशिष्टपूर्ण असा का असतो, सर्वसामान्य बाटलीसारखी का नसतो, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?
कोल्ड्रिंक किंवा सोड्याची बाटली खरेदी केल्यानंतर या बाटलीच्या वैशिष्टपूर्ण आकारानं तुमचं लक्ष नक्कीच वेधलं असेल. कोणत्याही कंपनीच्या कोल्ड्रिंक किंवा सोड्याच्या बाटल्या खालच्या बाजूने एकसारख्या असतात. मात्र त्या तुलनेत पाण्याच्या बाटलीचा आकार मात्र वेगळा असतो. रिपोर्टनुसार हा आकार फक्त डिझाइन म्हणून नाही तर त्यामागे कारणही आहे.
कोल्ड्रिंकच्या बाटलीची खास गोष्ट म्हणजे, या बाटलीच्या खालील बाजूस म्हणजेच तळाशी पाच किंवा तीन बंप (Bump) असतात. ही बाटली कधीही सरळ किंवा फ्लॅट नसते. मात्र पाण्याच्या बाटलीसाठी खास डिझाईनची गरज नसते. कोल्ड्रिंकच्या बाटलीचा तळाचा भाग वैशिष्टयपूर्ण असण्यामागे महत्त्वाचे कारण असते ते म्हणजे गॅस.
ज्या कोल्ड्रिंक्समध्ये फिज असतो, त्याच्या बाटल्यांची रचनाही खास असते. खरं तर असं होतं की जेव्हा कोल्ड्रिंक थंड केलं जातं तेव्हा त्याचा व्हॉल्यूम सतत बदलत राहतो. तसेच त्यात गॅस असल्यानं बाटलीचा आकार विशेष पद्धतीनं डिझाईन केलेला असतो. ड्रिंकच्या व्हॉल्यूमनुसार (Volume) बाटली अॅडजेस्ट होते आणि गॅसचा दाबही सहज नियंत्रित केला जातो. या खास बाटलीला कोरुगेशन (corrugation) असंही म्हणतात. तसेच, कार्बोनेटेड असल्यानं बाटलीच्या तळाशी दाब निर्माण होतो.
कोल्ड्रिंकच्या बाटलीचं आणखी एक वेगळंपण म्हणजे या बाटलीचा खालील भाग हा तुलनेनं जास्त कडक असतो. बाटली क्रश (Crush) केल्यानंतर तिचा वरील भाग अगदी सहजपणे वाकडा होतो. पण खालचा भाग आहे तसा राहतो. बाटलीची वाहतूक करताना किंवा हाताळताना नुकसान होऊ नये, यासाठी सॉफ्ट ड्रिंकच्या (Soft Drink) बाटल्यांचं डिझाईन हे वैशिष्ट्यपूर्ण असतं.