हॉटेलमधील सजावट, जेवण, इतर सुविधा या काळानुसार बदलत असतात. पण एक गोष्ट तशीच राहते. ती म्हणजे हॉटेलमधील बेडवरील पांढरी चादर. दिवसातून भलेही दोनदा हॉटेलमध्ये चादर बदलली जात असेल, पण त्यांचा रंग तोच राहतो. पांढऱ्या चादरी लवकर खराब होतात आणि सर्वात जास्त त्यांची काळजीही जास्त घ्यावी लागते. पांढऱ्या चादरी सांभाळून ठेवण्याचा खर्चही इतर रंगाच्या तुलनेत अधिक येतो. तरी सुद्धा जास्तीत जास्त हॉटेलमधील बेडवर पांढऱ्याच रंगाच्या चादरी असतात. पण असं का असतं? चला आज याचं उत्तर जाणून घेऊ....
काय आहे कारण?
पांढरा रंग हा शांतीचं प्रतिक मानला जातो. एक्सपर्ट सांगतात की, पांढऱ्या रंगाने स्ट्रेस दूर होतो. लोक जेव्हा सुट्टीवर येतात तेव्हा त्यांना तणावमुक्त व्हायचं असतं. काही दिवस शांततेत आनंदाने घालवायचे असतात. त्यांना आपल्या लोकांसोबत एन्जॉय करायचं असतं. अशात हॉटेलमधील पांढऱ्या रंगाची चादर त्यांनी शांतता मिळवून देण्यात मदत करते. पांढऱ्या रंगाची चादर मळतेही लवकर, मात्र एक फायदा असाही होतो की, पांढऱ्या रंगावरील डाग लगेच दिसून पडतात. ज्यामुळे ती धुण्यास सोपी पडते.
हॉटेलमधील चादरी धुवत नाहीत, मग?
पांढऱ्या चादरी साफ करणं फार सोपं असतं. तुम्ही म्हणाल ते कसं? तर घरी तर पांढरा रंगाचा शर्ट धुवून धुवून एकतर पिवळा पडतो नाही तर निळ दिल्यावर हलका निळा होतो. मात्र, हॉटेल्समध्ये पांढऱ्या चादरींचा रंग आणि चमक वर्षानुवर्षे तशीच राहते. कारण जास्तीत जास्त हॉटेलमधील चादरी धुतल्या जात नाहीत. त्यांना ब्लीच केलं जातं. ब्लीचच्या मदतीने त्यांवरील डाग लगेच दूर होतात. खास बाब म्हणजे ब्लीचमुळे त्यांच रंगही उडत नाही.
पांढऱ्या चादरीचा ट्रेन्ड कधीपासून?
हॉटेलमध्ये पांढऱ्या चांदरींचा वापर कसा सुरू झाला याबाबत एक किस्साही सांगितला जातो. झालं असं होतं की, वेस्टर्न डिझायनर्स नावाची कंपडे डिझाइन करणारी कंपनी आहे. त्यांनी १९९० मध्ये एक मोठा सर्व्हे केला होता. यात त्यांनी जाणून घेतलं होतं की, लक्झरीच्या नावावर लोकांना काय काय आवडतं. सर्व्हेतून समोर आलं होतं की, लोकांना स्वच्छता आणि चमक आवडते. लोकांना सर्व्हेत सर्वाधिक पांढऱ्या चादरीला पसंती दिली होती. ज्यानंतर अनेक हॉटेल्समध्ये पांढरी बेडशीट दिसू लागली. १९९० च्या आधीपर्यंत अनेक हॉटेल्समध्ये रंगीबेरंगी चादरींचा वापर होत होता.