Cursed River In India: भारतात अनेक नद्या आहेत. प्रत्येक नदीची आपली एक कहाणी आणि इतिहास आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, भारतात एक अशीही नदी आहे जी शापित नदी मानली जाते. इतकंच काय तर लोक या नदीच्या पाण्याला स्पर्शही करत नाही. त्यांचं मत आहे की, त्यांना भीती आहे की, या नदीच्या पाण्याला स्पर्श केला तर त्यांचे पुण्य पापात बदलतील. त्यांचं वाईट होईल. चला जाणून घेऊ कुठे आहे ही नदी....
या नदीचं नाव आहे कर्मनाशा नदी. कर्मनाशा नदीचा उगम बिहारच्या कैमूर जिल्ह्यातून झाला. त्यानंतर नदी यूपीमध्ये सोनभद्र, चंदौली, वाराणसी आणि गाजीपुर अशी वाहते. नंतर बिहारमध्येच बक्सरजवळ गंगा नदीला जाऊन मिळते. अशी मान्यता आहे की, सत्यव्रत म्हणजे त्रिशंकु नावाच्या राजाने गुरू वशिष्ठ यांच्याकडे शरीरासोबत स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तपस्या केल्यावर हे शक्य झालं. पण इंद्राने त्याला परत पाठवलं. तेव्हा तो राजा आकाशात उलटा लटकून राहिला.
असं म्हटलं जातं की, तेव्हा त्याच्या तोंडातून लाळ खाली पडत होती आणि यापासून एक नदी तयार झाली. नंतर गुरू वशिष्ठ यांनी सत्यव्रतला श्राप दिला आणि आता अशी मान्यता आहे की, याच श्रापमुळे ही नदी शापित आहे. असंही म्हटलं जातं की, नदीच्या पाण्याला ज्यानेही स्पर्श केला त्याचं काहीना काही वाईट होतं.
मीडिया रिपोर्टनुसार, नदीबाबत आणखी एक दंतकथा आहे. ती अशी की, प्राचीन काळात लोक जेवण बनवण्यासाठी या नदीचं पाणी वापरत नव्हते. इतकंच नाही तर एखाद्या हिरव्या झाडाला जर हे पाणी दिलं तर ते झाड मरतं.
एका दुसऱ्या रिपोर्टनुसार, अशीही मान्यता आहे की, कर्मनाशा नदीच्या किनारी बौद्ध भिक्षु राहत होते आणि हिंदू धर्म मानणारे लोक त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी कर्मनाशा नदीला अपवित्र म्हणू लागले.